Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ डिसेंबर, २०२०

दुचाकी वाहनांसाठी 22 डिसेंबर 2020 पासून नवीन वाहन मालिका MH-18 BU सुरू होणार



धुळे प्रतिनिधी दि.15 दुचाकी वाहनांसाठी 22 डिसेंबर 2020 पासून नवीन वाहन मालिका MH-18 BU सुरू होणार आहे. या मालिकेत 0001 ते 9999 पर्यंत क्रमांक आहेत. ज्या वाहनधारकांना आकर्षक अथवा उडते क्रमांक पाहिजे असतील त्यांनी 21 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी पाच यावेळेत विहित नमुन्यातील अर्ज भरुन प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास सादर करावा,असे प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 

तसेच अर्जासमवेत क्रमांकासाठी आवश्यक शुल्काचा एक धनादेश स्वत:च्या स्वाक्षरीने सील केलेल्या बंद पाकिटात सादर करावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास विहित शुल्काव्यतिरिक्त जास्त रकमेचा धनादेश अशा प्रकारे दोन धनादेश सीलबंद पाकिटात सादर करावेत. त्यापैकी ज्या व्यक्तीचा धनादेश हा जास्त रकमेचा असेल त्या व्यक्तीस क्रमांक बहाल करण्यात येईल.21 डिसेंबर 2020 नंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची वाहन धारकांनी नोंद घ्यावी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध