Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २० डिसेंबर, २०२०

शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने तहसीलदार हातकणंगले,उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले.....!


   

शिवसेना शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने तहसीलदार, हातकणंगले ,उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले. शिव अल्पसंख्यांक सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री विवेकसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली शिव अल्पसंख्यांक सेनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
      
निवेदनात अल्पसंख्याक समाजातील तरुणांना व महिलांना रोजगार निर्माण होण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदन देताना शिव अल्पसंख्यांक सेना हातकणंगले तालुका प्रमुख शौकत भाई मुल्ला, इचलकरंजी युवासेना युवा उपाधिकारी शाहरुख मुजावर आदी शिवसैनिक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध