Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २० डिसेंबर, २०२०
Home
/
Unlabelled
/
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाकडे मागणी निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करावे – अरुण धोबी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाकडे मागणी निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करावे – अरुण धोबी
शिरपूर : भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्र, बेघरांना आसरा असा संदेश देत या गोष्टीचे महत्व जनमानसात रूजविणारे विविध माध्यमातुन समाजसुधारणेचे व्रत घेतले स्वच्छताचे पुरस्कर्ते निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी परिट (धोबी ) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांची ६४ वी पुण्यतीथी निमित्त केंद्र व राज्य सरकार कडे केली आहे.
निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे या मागणीचे पत्र परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी, मुख्यमंत्री ना. श्री. उध्दव ठाकरे यांना पाठविले आहे. निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांनी गावागावात किर्तनातुन स्वच्छताचे महत्व जनमानसात रूजविण्यासाठी तसेच समाजातील वाईट चालीरिती संपुष्टात आणण्यासाठी आजन्म परिश्रम घेतले.
त्यांचे जीवन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत वर्षासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. निष्काम कर्मयोगी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांनी अंध, पंगु रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशु पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण तरुणींचे लग्न, दुखी व निराशांना हिंमत द्यावे यासाठी जनमानसात सतत किर्तनाचा माध्यमातुन जनजागृती केली त्यांचा या महान कार्याची दखल घेवुन त्यांना मरणोत्तर भारतरत्न या उपाधीने सन्मानित करत त्यांना आदरांजली प्रदान करावी, अशी मागणी परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचाकडे पत्र पाठवुन केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा