Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ५ डिसेंबर, २०२०
तऱ्हाडकसबे येथे शिरपूर पॅटर्न अंतर्गत २४८,२४९ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन..!
शिरपूर प्रतिनिधी तालुक्यातील तऱ्हाडकसबे येथे जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग अंतर्गत शिरपूर पॅटर्न अंतर्गत २४८, २४९ व्या बंधाऱ्याचे भूमिपूजन दि. ५ डिसेंबर रोजी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार काशीराम दादा पावरा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार काशीराम पावरा, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, उपसरपंच महेश पाटील, तंटामुक्तीचे हिम्मतसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य मोती भील, जगन कोळी, अभिमन कोळी, दिलीप पाटील, नाना कोळी, भटाणे पोलीस पाटील, अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकरी बांधव व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.
माजी मंत्री अमरिशभाई पटल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात "शिरपूर पॅटर्न" अंतर्गत २४७ पेक्षा जास्त बंधारे बांधून पूर्ण झाले असून सर्व बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने त्या त्या भागातील शेतकरी बांधव व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यापुढे देखील ३०० पेक्षा जास्त अजून नवीन शिरपूर पॅटर्न बंधारे बांधण्याचा माजी मंत्री अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिरपूर तालुक्यातील विकास कामांमध्ये खंड पडू न देता पटेल परिवाराच्या योगदानातून विकास कामांची मालिका सातत्याने सुरुच आहे. याबद्दल शिरपूर तालुक्यात सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा