Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २३ डिसेंबर, २०२०
तुमच्या गोरख धंद्या मुळे तुमच्या वर गुन्हे दाखल
तुमच्या गोरख धंद्या मुळे तुमच्या वर गुन्हे दाखल होतात भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पारस ललवाणी यांना पत्रकार परिषदेमध्ये दिले उत्तर...
जामनेर प्रतिनिधी:जामनेर चे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी दोन दिवसांपूर्वी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले असता या अनुषंगाने आज भाजपाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी पारस ललवाणी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.पत्रपरिषद उत्तरामध्ये त्यांनी सांगितले की तुम्हीच पत्ते खेळताना सापडतात, तुम्हीच एखाद्या महिलेच्या घरांमध्ये घुसतात, संस्थाचालक होते तेव्हा घोटाळे करतात मग तुमच्यावर गुन्हा दाखल होणार नाही तर काय होईल हे तुमच्या कर्माचे फळ आहे. तुमचे सर्व काळे धंदे जामनेरकर जनता जाणून आहे. आणि गुन्हा दाखल होण्याचे खापर आमदार गिरीश महाजन यांच्यावर फोडतात. तुमचे सर्व गोरख धंदे काय आहे ते आम्हाला माहीत आहे आम्ही ते सांगणार नाही कारण ती भाजपाची संस्कृती नाही.
तुम्ही नगराध्यक्ष असताना तुम्हाला तुमचे नगरसेवक सांभाळता आले नाही. शेवटी त्यांनी गिरीश भाऊ यांच्या विकासाला साथ दिली.तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तुमच्या दुष्कृत्याची सीडी व पेन ड्राइव्ह च्या माध्यमातून आमच्याकडे आहे. अशा परखड शब्दांत सांगितलं शेतकरी सहकारी संघ संदर्भात प्रत्येक गाळा धारकाकडून
वीस लाख रुपये चेकद्वारे घेण्यात आलेले आहे
त्यामुळे यात कोणताही गैरप्रकार नाही अशाप्रकारे पारस ललवाणी यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. बी.ओ.टी.व नगरपालिके संदर्भात गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे नगरसेवक महेंद्र बाविस्कर प्राध्यापक शरद पाटील यांनी तर शिक्षण संस्थे संदर्भात एडवोकेट शिवाजी सोनार यांनी ही समाचार घेतला. या पत्रपरिषदेला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील सचिव जितेंद्र पाटील उपनगराध्यक्ष अनिस शेख, श्रीराम महाजन, दीपक तायडे, अतिश झालटे, अरविंद देशमुख, संतोष बारी, रवींद्र झाल्टे, नाझिम पार्टी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा