Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ डिसेंबर, २०२०
उस्मानाबाद चिंचपुर (बु) येथे वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपन..!
परंडा, प्रतिनिधी दि.19 तरुणगर्जना न्यूजचे विभागीय संपादक तथा विश्वजन आरोग्यसेवा समिती महाराष्ट्र राज्य चे परंडा तालुका आरोग्यदूत यांनी आज आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण केले व पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश समाजा समोर दिला.
नुकताच त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने ''राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2020 जाहीर झाला आहे.सदर पुरस्काराचे वितरण 30डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे होणार आहे.
तसेच कोरोना संसर्गजन्य काळत विश्वजन आरोग्य सेवा समिती मार्फत लोकांत जनजागृती करून तालुक्यात सहा ठिकाणी महारक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केले होते. रुग्णांना अल्पदरात औषधे उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या अनेक समाजभिमूख कार्याची दखल घेऊन शिवशंभो संघटनेच्या वतीने देखील राज्यस्तरीय पुरस्कार 12जानेवारीला राजमाता जिजाऊंच्या जयंती निमित्त पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.
या यशाबद्दल त्यांचे पंचक्रोशीत व पत्रकारितेच्या क्षेत्रातून अभिनंदन होत आहे व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा