Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०
जात पडताळणी समितीचे कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार...!
जळगाव, (प्रतिनिधी)दि.24 -राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषीत केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक केलेले आहे.
त्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात मोठया प्रमाणात निवडणुकीस उभे राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडुन अर्ज दाखल होत आहे.
निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होवू नये, याकरीता 25 ते 27 डिसेंबर, 2020 या शासकीय सुटीच्या दिवशी सकाळी 9.45 ते 6.15 या कार्यालयीन वेळेत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव येथील कार्यालय उमेदवारांचे अर्ज स्वीकारणेसाठी नियमीत सुरु राहील. असे सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा