Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०
एका अज्ञाताने सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या...!
शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात एका अज्ञाताने सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. मोहित दिनेश ईशी (6) भरदुपारी हा खून झाला असावा असे बोलले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच तालुका व जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या. अंतुर्ली येथील दिनेश शिवाजी व ज्योती दिनेश ईशी यांचा तो मुलगा होता.
मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता. दुपारी खेळत असताना अचानक गायब असल्याचे आई ज्योती हिच्या लक्षात येताच शोधाशोध सुरू केले परंतु तो मिळून आला नाही. शोध घेत असतांना सायंकाळी उशिरा एका शेतात तो मृतावस्थेत आढळून आला.
घटनास्थळी डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पीएसआय सोनवणे, पोहेकॉ गुलाब ठाकरे,पोलीस नाईक अनिल शिरसाट,ललित पाटील, दिनेश माळी, रवींद्र ईशी,सनी सरदार, बापूजी पाटील,अमित जाधव,उमेश पाटील, स्वप्नील बांगर आदींनी पाहणी केली. तर घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, स्वान पथक, सायबर क्राईम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींचे अधिकारी व कर्मचारी होते. घटनेचा पुढील अधिक तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा