Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

दोंडाईचा येथे माजी मंत्री,आमदार जयकुमार भाऊ रावल यांना शिंदखेडा शहरात नवीन रस्त्यांसाठी गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह नगरसेवकांनी दिले निवेदन.



शिंदखेड़ा दिनांक 24 नोव्हेंबर 2020 रोजी दोंडाईचा येथे माजी मंत्री,आमदार जयकुमार भाऊ रावल यांना शिंदखेडा शहरात नवीन रस्त्यांसाठी गटनेते अनिल वानखेडे यांच्यासह नगरसेवकांनी दिले निवेदन.

शिंदखेडा शहरात भगवा चौक ते नदीपात्र व निरंजन कॉम्प्लेक्स ते गणेश कॉलनी जुना चौगाव रस्ता हे अतिशय खराब झाले असून यांचे नवीन काम करण्यात यावे  यासाठी निवेदन देण्यात आले माजी मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या कल्पनेतून साकारण्यात आलेल्या बुराई नदी  वरील नवीन पूला  मुळे भगवा चौकापासून  या रस्त्याने धुळे, चिरणे, कदाने, महाळपुर, बाबुळदे, खलाने, वायपुर असे गावांसह माळीवाडा ,जनता नगर व रज्जाक नगर- नदीपार भिलाटी  या परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो सदर भगवा चौक ते नदी पात्र हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत असून हा रस्ता  नवीन करण्यात यावा तसेच स्टेशन रोड लागत निरंजन कॉम्प्लेक्स ( जुना चौगाव रस्ता) ते ,गणेश कॉलनी पर्यंत हा रस्ता देखील जिल्हा परिषद अंतर्गत असून, अतिशय खराब असून सदर रस्त्यावरून कॉलनी परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वापर असून सदर रस्ता नवीन करण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. 

या वेळी आमदार जयकुमारभाऊ रावल यांनी पुळील कार्यवाही साठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज भाऊसाहेब याना आदेश देत लवकरात लवकर सदर  रस्त्याचे काम जिल्हा परिषद अंतर्गत करण्याचे आदेश जयकुमरभाऊ रावल यांनी दिलेत.  

या वेळेस नगरपंचायतीचे नगराध्यक्षा सौ. रजनीताई वानखेडे,गटनेते अनिल  वानखेडे यांच्या सह  उपनगराध्यक्ष भिला पाटील, सभापती प्रकाश आप्पा देसले, नगरसेवक जितेंद्र जाधव, नगरसेवक विनोद पाटील, नगरसेवक अर्जुन भिल,माजी नगरसेवक राहुल कचवे व भाजपा शिंदखेडा शहराध्यक्ष प्रवीण माळी सह कल्पेश अहिरे व गिरीश चौधरी हे निवेदन  देण्यास उपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध