Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ जानेवारी, २०२१

अमळनेर मतदारसंघातील 21 ग्रामपंचायती बिनविरोध...!



विकासात्मक प्रयत्नांचे आमदार अनिल पाटील यांनी मानले गावकऱ्यांचे आभार.

प्रतिनिधी अमळनेर मतदारसंघातील 21 ग्रामपंचायती बिनविरोध असून गावागावात सर्व गटांनी एकत्र बसून एकोपा व संयमाचे विकासात्मक दर्शन गावकऱ्यांनी दाखविले व आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिला त्याबद्दल आमदार अनिल पाटील यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आहेत.

तालुक्यातील एकतास, कुर्हे बु, कलाली, जळोद, आमदार अनिल पाटील यांच्या हिंगोणे खु.प्र.ज या पाच ग्रामपंचायती अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच बिनविरोध झाल्या होत्या. तर सोमवारी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीत पिंपळे बु, शहापूर, दापोरी बु, अटाळे, टाकरखेडा, कळंबु, फाफोरे बु, धानोरा, देवगाव देवळी, बोदर्डे या गावांचा समावेश आहे तर मतदारसंघातील तर पारोळा तालुक्यातील असलेल्या दळवेल,जिराळी, इंदवे, महाळपूर,भोलाणे, वसंतनगर. आदी सहा गावात बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे मतदारसंघातील एकूण 21 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता कोणाची येते हा विषय इर्षेचा असतो परंतु बर्‍याचदा यातील वाद, तंटे हे निवडणूकीनंतरही कायम राहतात त्याचा परिणाम विरोधाला विरोध करण्याची मानसिकता बळावते. हे सर्व टाळण्यासाठी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी गावातील सर्व घटकांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.

कोरोनाच्या काळात गावात एकोपा टिकून राहावा एवढाच उद्देश असल्याचे पाटील म्हणाले. यातुन ग्रामविकासासाठी चालना मिळणार असून व सध्याचे कोरोनाचे संकट बळावू नये हाच हेतू डोळ्यासमोर ठेवत ग्रामपंचायती आपल्या आवाहना नुसार बिनविरोध केल्याबद्दल त्या त्या ग्रामस्थांचे आपण आभार व्यक्त केले असून या गावांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी प्रतिक्रिया आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध