Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
उपक्रमशील शिक्षक सुनिल मोरे यांनी दिले टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्मितीचे ऑनलाइन धडे...!
उपक्रमशील शिक्षक सुनिल मोरे यांनी दिले टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्मितीचे ऑनलाइन धडे...!
शिंदखेडा प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिक यांच्या वतीने व्यावसायिक विकास मंच द्वारे नाशिक विभागातील सर्व शिक्षकांसाठी टाकाऊतून शोभिवंत कलाकृती निर्मितीची दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यात धुळे जिल्ह्यातील चुडाणे तालुका शिंदखेडा येथील उपक्रमशील शिक्षक तथा हस्तशिल्पकार म्हणून नावलौकिक असलेल्या सुनिल मोरे यांनी ऑनलाइन कार्यशाळा घेऊन विभागातील शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यशाळेचे प्रास्तविक व्यावसायिक विकास मंच च्या समन्वयक तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिकच्या अधिव्याख्याता डॉ.संगीता महाजन यांनी केले तर विषय सहायक प्रदीप शिंदे यांनी परिचय करून दिला. प्रादेशिक विद्या प्राधिकरणचे उपसंचालक मा जालिंदर सावंत यांनी कार्यशाळेसाठी विभागातील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
सुनिल मोरे यांनी दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षकांना नारळाच्या टाकाऊ करवंटी पासून कासव,फुले,पेंडंट,मासे,फुलदाणी कशी निर्मिती करावी याचे आपल्या हस्तकौशल्यातून प्रात्यक्षिक दाखवले.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील विषयाचा दृष्टिकोन आणि कृतीयुक्त आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यात कला-कार्यानुभव विषयाच्या माध्यमातून कसा साधता येऊ शकतो याबाबत त्यांनी अतिशय अभ्यासू असे विवेचन केले.कलेच्या मुक्त आविष्कारातून विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापरातून सर्जनशीलता,नवनिर्मिती,सहकार्य वृत्ती,श्रमप्रतिष्ठा,पर्यावरण जाणीव,
सौंदर्यदृष्टी,कृतीप्रधानता,पारंपरिक संस्कृती संवर्धन,शोधक वृत्ती,मार्यदित स्वरूपात अर्थार्जन करण्याची क्षमता आणि व्यवसायिक कौशल्ये कसे प्राप्त होऊ शकतात हे उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितले.
भाषा विषय सहायक उदयकुमार कुऱ्हाडे यांनी या कार्यशाळेत मुलाखातीद्वारे सुनिल मोरे यांच्याकडून शिक्षकांना या अभिनव उपक्रमाचे आणि हस्तकलेचे ज्ञान मिळवून दिले.नारळाच्या करवंट्यापासून विविध प्रकारच्या साहित्य कसे तयार करावे आणि याचा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे उपयोग होऊन त्यांच्यातील कृतीशीलता वाढवता येऊ शकते हे प्रात्यक्षिकासह उलगडून दाखवले.या आगळ्यावेगळ्या कार्यशाळेला शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेत नंदुरबार, नाशिक,धुळे व जळगाव या जिल्ह्यातील सर्व जेष्ठ अधिव्याख्याता ,अधिव्याख्याता,विषय सहायक ,मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या या कार्यशाळेत शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि पुढील काळात अश्याच कार्यशाळेच्या आयोजनाविषयी मागणी केली.कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ अधिव्याख्याता शिवाजी औटी यांनी सर्वांचे आभार मानून या अभिनव ऑनलाइन कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा