Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ जानेवारी, २०२१
धुळे जिल्ह्यातील सरपंच पदासाठी 28 जानेवारीला आरक्षण सोडत..!
धुळे प्रतिनिधी दि. 22:धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील 390 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी 28 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सर्व संबंधित तहसील कार्यालयांमध्ये सोडत सभेचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सर्व संबंधित तहसीलदारांना दिले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी हेमांगी पाटील (प्रशासन) यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
तसेच धुळे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी (साक्री व शिरपूर या तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या महिला आरक्षणासह) संबंधित उपविभागीय अधिकारी निश्चित करतील त्या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली 1 फेब्रुवारी 2021 रोजी महिला आरक्षणाची सोडत सभा आयोजित करण्यात येईल, असेही उपजिल्हाधिकारी श्रीमती पाटील यांनी म्हटले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा