Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २३ जानेवारी, २०२१
तोरणमाळ येथे ५०० फूट खोल दरीत वाहन कोसळून सातजण ठार,२० जण जखमी..!
शाहदा प्रतिनिधी:ता.शहादा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पर्यटनस्थळी खडकी जाणाऱ्या घाटात ५०० फूट खोल दरीत मजुरांचे वाहन उलटून सातजण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अपघातात २० जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असून जखमींना तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
सातपुड्याच्या सहाव्या रांगेतील खडकी हे गाव खोल दरीत आहे. तेथे जाण्यासाठी नुकताच तोरणमाळ ते खडकी हा घाट रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे अद्यापही ठिकठिकाणी काम बाकी आहे.
शनिवारी सकाळी खडकीहून तोरणमाळकडे मजुर घेऊन येणारे पीकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण तीव्र चढाव आणि वळणावर सुटले. त्यामुळे वाहन थेट ५००फूट खोल दरीत कोसळले. त्यात सातजण ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू असून म्हसावद पोलीस घटनास्थळी
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा