Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २ जानेवारी, २०२१
पोलीस स्टेशन आंबी येथे विश्वजन आरोग्य सेवा समितीचे महारक्तदान शिबिर संपन्न....
भूम (राहूल शिंदे)दि.1 तालुक्यातील देवगव आंबी येथे आज विश्वजन आरोग्य सेवा समितीच्या व पोलीस स्टेशन आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भासत आहे. म्हणून विविध संस्था, प्रतिष्ठानांनी रक्तदान शिबिर आयोजित करा असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आवाहन केले होते म्हणून, विश्वजन आरोग्य सेवा समितीच्यावतीने, वर्धापनदिना निमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन विश्वजन आरोग्यसेवा समितीच्या संस्थापक अध्यक्षा सौ.छायाताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन वर्षाचे स्वागत महारक्तदान शिबिराचे आयोजन करून करण्यात आली.
प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व तुळजाभवानी माता यांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक शरद वाघुले यांच्या हस्ते करून महारक्तदान शिबिरास सुरुवात झाली.
विश्वजन आरोग्यसेवा समिती व पोलीस स्टेशन आंबी यांच्या नियोजनाखाली...... रक्तदात्यांनी रक्तदान केले. या महारक्तदान शिबिराला युवक वर्गांनी विश्वजन आरोग्य समितीला भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे परिसरामध्ये समितीचे पोलीस स्टेशनचे कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना खांडेकर म्हणाले की रक्ताची खरी किंमत त्याचं व्यक्तीला कळते ज्याच्यावर वेळ येते.रक्ताचे काय महत्व आहे हे मी जवळून पाहिले आहे, नागरिकांनी,युवकांनी व सामाजिक संघटनांनी देखील अशा छोट्या मोठ्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपली सामाजिक बांधिलकी जोपसवी.व समाजा समोर एक वेगळा आदर्श निर्माण करावा.शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.रक्त संकलन करण्यासाठी बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्त पेढिने विशेष सहकार्य केले.
यावेळी धाराशिव जिल्हा समन्वयक सोमनाथ कोकाटे, रावसाहेब काळे विश्व मराठा संघ परंडा तालुकाध्यक्ष,परंडा तालुका आरोग्यदुत राहुल शिंदे, भूम तालुका आरोग्यदूत किशोर गटकळ, परंडा तालुका आरोग्य समन्वयक तानाजी कासारे, पोलीस पाटील रविंद्र तांबे,अंगद गटकळ, नागराज नाईक,पो.कॉ कुंभार आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा