Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिवसेना कार्यालय गणेश मार्केट सांगली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली....!
शिवसेना कार्यालय गणेश मार्केट सांगली येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली....!
सागली प्रतिनिधी:आज रविवार दिनांक 3/1/2021 रोजी शिवसेना कार्यालय गणेश मार्केट सांगली येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सांगलीतील ज्येष्ठ समाजसेवक सतीश भाऊ साखळकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच शिवसेना महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी शहा व प्रियंका साळी यांनीही प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
तसेच सतीश साखळकर यांना कोरोणा योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी चर्चा करताना सावित्रीबाई फुलेंनी संपूर्ण भारतात शिक्षणाचा प्रसार केला महिलांच्या शिक्षणासाठी प्रबोधन केले तसेच यावेळी चर्चा करत असताना शिक्षणाच्या बाबतीत सांगली-मिरज शहर खूप महत्त्वाचे असताना अशा मोठ्या शहरांमध्ये एखादे विद्यापीठ असावे जसे की कृषी विद्यापीठ, वैद्यकीय विद्यापीठ, क्रीडा विद्यापीठ, इत्यादी सारखे विद्यापीठ सांगलीत असावे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र असणे गरजेचे आहे अशी मागणी जनतेचे असल्याने याकडे केंद्र सरकारने राज्य सरकारने व स्थानिक मंत्राने लक्ष घालून येथे विद्यापीठ उभा करावे अशी शिवसैनिकांच्या वतीने मागणी करण्यात आली .
यावेळी साखरकर म्हणाले येथून पुढच्या काळात सांगलीच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे सांगली मिरज शहर हे खूप मोठे आहे पण त्या तुलनेत खूप मोठ्या सुविधांपासून वंचित आहे हे कार्यकर्त्यांनी व शासनाने लक्षात घ्यावे यावेळी रावसाहेब घेवारे, प्रभाकर कुरळपकर, जितेंद्र शहा, प्रियंका साळी, शिवसेना महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी जितेंद्र शहा, जयश्री कोळी,बाहुबली ट्रान्सपोर्टचे मालक श्री महेश पाटील,प्रशांत भोसले,उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा