Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

शेगांव बस स्थानकातच एसटी बसला आग..!शॉर्ट सर्किटमुळे बसला लागली आग..!



शेगाव :प्रतिनिधी (उमेश राजगुरे))येथील बस स्थानकावर उभी असलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशां मध्ये धांदल उडाली.प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर- उभ्या असलेल्या शेगाव अकोला संविधान एक्सप्रेस ने अचानक पेट घेतला. त्यामुळे काही काळ बसस्थानकावर प्रवाशांची घाबरगुंडी उडाली त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शेगाव बस स्थानकावर अकोला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर संविधान एक्सप्रेस बस क्रमांक एमएच ४० वाय ५१२३ उभी होती. 

बसमध्ये प्रवासी चढले. यावेळी बसच्या केबिनमधून अचानक धूर येत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. ही बाब प्रवाशांनी बस स्थानकावरील कर्मचाऱ्यांना
सांगितल्यावर अचानक धावपळ
निर्माण झाली. 

तत्काळ सुरू असलेले इंजिन वायरिंग तोडून बंद करण्यात आले व आग विझविण्यात आली.यामुळे पुढील दुर्घटना टळली. प्रवाशांनीसुटकेचा निश्वास सोडला. मात्र काही वेळ प्रवाशांमध्ये घबराट पसरून खळबळ निर्माण
झाली होती. 

सुरक्षित प्रवास समजल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना आवश्यक ते साहित्य पुरविण्यात येत नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून बसेस चालवाव्या लागत आहेत. 

शासनाने याकडे गंभीरतेने बघण्याची गरज असून एसटी महामंडळाला आवश्यक ते बस दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी करण्यात येत आहे.तसेच शॉक सर्किटने आग नेमकी कशी लागली याचा शोध सुरू आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध