Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ११ जानेवारी, २०२१
स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्काराने अमर हजारेंचा सन्मान
बीड (रहूल शिंदे)दि. 10 युवकमित्र परीवार नंदुरबार या संस्थेकडून महाराष्ट्रभर वाचन चळवळ राबवण्यात येत आहे. तसेच दरवर्षी विवीध क्षेत्रात ऊल्लेखणीय कामगीरी करणार्या सेवाभावी व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे काम युवकमित्र परीवार नंदुरबार यांच्याकडून होत आहे.
अमर हजारे यांना यावर्षीचा स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
युवकमित्र परीवाराने समाजातील विवीध क्षेत्रात उल्लेखणीय कामगीरी करणार्या व्यक्तींचा सन्मान आईसाहेब जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती दिनी म्हणजे युवा दिनाचे औचीत्य साधून सन्मान केला जातो.
सामाजिक क्षेत्रात व चळवळीत समर्पीत भावनेने कार्य करणारे स्नेहसावली परीवाराचे संचालक तथा आई सावित्रीमाई फुले व तात्यासाहेब महात्मा फुले यांनी सुरु केलेली पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक व्हावी म्हणुन महाराष्ट्रभर उपोषण, आंदोलन, मोर्चे करून सरकार दरबारी मागणी करणारे युवा व्याख्याते अमर हजारे यांना राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
83 वर्ष अविरत सेवेची पंरपंरा असलेल्या पत्रकार भवन पुणे येथे प्रमुख वक्ते युसुफ पठाण, यशवंत मानखेडकर, छाया भगत, मुकुंद शिंदे, बाळकृष्ण बागुल, प्रवीण प्रधान, उज्वला गायकवाड, ज्ञानेश्वर दळवी, मयुर बागुल व युवकमित्र परिवाराचे अध्यक्ष प्रवीण महाजन यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. हा सत्कार जबाबदारी वाढवणारा आहे अशी भावना या वेळी अमर हजारे यांनी व्यक्त केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा