Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ जानेवारी, २०२१

जय हिंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद..!




नळदुर्ग प्रतिनिधी:राजमाता जिजाऊ माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त जयहिंद प्रतिष्ठानच्या नळदुर्ग च्या वतिने प्रतिवर्षी  प्रमाणे भव्य असे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली, 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक शिवाजीराव मोरे होते, शिबिराचे उद्घाटन जेष्ठ समाजसेवक डॉ. सिद्राम खजुरे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग महामार्ग पोलीस स्टेशनचे सपोनि कवले, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शहबाज काझी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शफीभाई शेख, समाजसेवक अझहर जहागीरदार, रोटरी क्लब नळदुर्गचे अध्यक्ष रमेशजी पिस्के, भाजयुमो शहराध्यक्ष श्रमिक पोतदार उपस्थित होते. 
      
शिबिराच्या उदघाटनपर भाषणात नळदुर्ग येथे अनेक वर्षांपासून रुग्णांची सेवा करणारे डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी बोलताना जय हिंद प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरासारख्या समाजउपयोगी कार्याचे कौतुक केले व रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना म्हणाले की एकदा रक्तदान करणारा व्यक्ती हा केवळ एकदा रक्तदान करत नसून तो एका व्यक्तींचे जीव वाचविण्याचे महत्वाचे काम करत असतो तसेच रक्तदान केल्याने शरीरात नवीन शुद्ध रक्त तयार होते. 

त्यामुळे शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो यामुळे सर्वांनी रक्तदान केले पाहिजे असे आवाहन यावेळी केले तसेच यावेळी प्रमुख पाहुणे महामार्ग पोलिसचे कवले साहेब यांनी रक्तदान करने महत्वाचे असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाला रक्त महत्त्वाचे असते अत्यंत तातडीने रक्ताची गरज भासते त्यावेळी आपण दिलेले रक्त हे त्यावेळी त्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यास उपयोगी पडते यासोबतच महामार्गावर गाडी चालवत असताना सर्वांनी आवर्जून हेल्मेट वापरले पाहिजे, चारचाकी वाहने चालवताना सीटबेल्ट वापरावे असे आवाहन केले या शिबिरात महिलांची संख्या लक्षणीय होती सात महिलांसह एकूण 95 रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी, विधिज्ञ व तरुण कार्यकर्ते यांनी प्रामुख्याने रक्तदान केले, 

या शिबीरात रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना कचराकुंडी भेट देत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेऊन आपलं परिसर आपलं गाव स्वच्छ ठेवण्याच संदेश या उपक्रमात दिला. निलय्या स्वामी, संतोष वाले, विजयकुमार डुकरे,संगमेश्वर व्हनाळे, शिवय्या स्वामी, कल्लप्पा कलशेट्टी, रवी कलशेट्टी,अभिजीत खारेसर, संतोष बताले, मनोज राजमाने, आनंद बताले यांनी परीश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले यांनी तर आभार अभिजित खारे सर यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध