Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १२ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
समाजसेवेचा हा हि एक मार्ग, त्याच मार्गावरचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे डॉ राकेश रमेश फुलपगारे....
समाजसेवेचा हा हि एक मार्ग, त्याच मार्गावरचे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे डॉ राकेश रमेश फुलपगारे....
भोईसमाजात अनेक व्यक्ती आईवडिलांच्या कृपेने,शिक्षण,परीक्षमाने व स्वकतृत्वाने डॉक्टर, इंजिनिअर तसेच शासकीय निमशासकीय विभागात उच्च पदावर कार्यरत आहेत, अशातील एक युवा डॉक्टर जे भोईसमाजाचे एक आदर्श म्हणुन नक्कीच संबोधले गेले पाहिजे ते का ? तर त्याच्या या कार्याने, नाशिक मध्ये त्यांना साजेश फुलपगारे मॅटर्निटी हॉस्पीटल त्यांनी काहि वर्षानपुर्वी सुरु केले त्यांच्याकडुन होतील ती सेवा समाजाची करीत असतात परंतु आज असे हि लक्षात आले की त्यांच्याकडे येणारे भोईसमाजाचे पेशंटचे ते सर्वसाधारण चेकअपचे पैसे घेत नाहि हा त्यांचा मोठेपणा आहे,
आणि हाच एक आदर्श हि असे म्हणण्यास वावगे ठरणार नाहि, याचाच अर्थ असा नाहि की सर्व उच्च शिक्षित, डॉक्टर्स, इंजिनिअर्स किंवा उच्चपदावर कार्यरत समाज बांधवांनी भोईसमाजाचे कुठलेहि काम मोफत करावे परंतु आज ब-यावेळेस चालता बोलता अशाहि गोष्टी कानावर पडतात की उच्चपदावर कार्यरत व्यक्ती सर्वसामान्य भोईसमाज बांधवांना आपली ओळख दाखवित नाहि अशा सर्व व्यक्तींना विनंती आहे की कृपया असे करू नये, भोईसमाजाच कुठलीही व्यक्ती असो ती आपलाच समाजाचे डॉक्टर, इंजिनिअर किंवा उच्चपदावर, शासकीय स्तरावर कार्यरत आसणा-या व्यक्तींकडेच का जातात ?? याचे महत्वाचे कारण म्हणजे तुम्हिच सर्वसामन्यांचा आदर्श असतात सर्वसामान्य भोईबांधवांना एक खात्री असते की आपली व्यक्ती आहे ती आपल्याला चुकीचा सल्ला देणार नाहि योग्य मार्गदर्शन करेल व आपले काम कमी वेळेत सुयोग्य पद्धतीनेच होईल या पेक्षा जास्त अपेक्षा सर्वसाधारण समाज बांधवांची कधीच नसते म्हणुन भोईसमाजाला एकरुप करण्यासाठी आपणहि हे पाऊल उचलुया कहि क्षण समाजाला देऊन समाजकार्यात मोलाचा वाटा उचलुया.
आशाच कामाची पावती म्हणुन पेशाने डॉक्टर असल्या कारणाने कामातुन वेळ न मिळाल्याने समाजाच्या बैठकीस किंवा सर्वच कार्यक्रमात आपली उपस्थिती न देऊ शकणारे परंतु तरीहि समाजिक बांधिलकीची जान ठेऊन अशा अनोख्या पद्धतीने समाजकार्य करणा-या डॉ. राकेश फुलपगारे यांना मानाचा सलाम...!!!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा