Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ११ जानेवारी, २०२१

श्री अविनाश मल्लाव यांची पुणे जिल्हा मल्लाव समाज जिल्हा अध्यक्षपदी निवड..!



पुणे प्रतिनिधी:समस्त मल्लाव समाज बांधवांना या संदेशाद्वारे कळविण्यात येते की, आपल्या समाजातील थोर समाज सेवक कै श्री दादासाहेब किसनराव मल्लाव यांचे दिनांक २१/०८/२०२०रोजी अकाली निधनानंतर समाजात जी सामाजिक नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती तसेच समाजाची आर्थिक, सामाजिक प्रगती थांबल्यागत झाली होती. 

एकंदरीत समाजात नैराश्याची मरगळ निर्माण झाली होती त्यामुळे जिल्ह्यातील समाज बांधवांना सामाजिक प्रबोधन पर दिशा दाखविण्यासाठी अध्यक्ष पदावर समाज बांधवाची नियुक्ती करणे महत्त्वाचे झाले होते तसेच समाजाची पुढील वाटचाल करण्याकरिता सदर अध्यक्षपदाबाबत समाज पातळीवर चाचपणी करून, ज्येष्ठ विचारवंतांना विचारून, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन अध्यक्ष पदाबाबत विचारणा केली असता शिरूर नगर पालिकेचे माजी शिक्षणमंडळ उपसभापती तसेच संपूर्ण शिरूर विभागात सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेले श्री अविनाश हरीभाऊजी मल्लाव यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव करण्यात आला त्यानूसार श्री अविनाश हरीभाऊजी मल्लाव यांची निवड पुणे जिल्हा मल्लाव समाज जिल्हा अध्यक्ष पदा झाल्याचे जाहीर करण्यात आले.

समस्त मल्लावसमाज पुणे जिल्हा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध