Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

जामनेर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी प्रा.शरद पाटील सर यांची निवड...!



जामनेर प्रतिनिधी: ०४/०१/२०२० रोजी जामनेर नपा सभागृहात आयोजित बैठकीमध्ये पीठासीन अधिकारी तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर नगरपालिकेच्या  उपनगराध्यक्ष पदी एक वर्षासाठी प्रा. शरद पाटील सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

प्रा. शरद पाटील सर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्षा सौ साधना महाजन तहसीलदार अरुण शेवाळे मुख्याधिकारी राहुल पाटील जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष अनिश शेख गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध