Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

महामंडलेश्‍वर स्वामी श्री.जनार्दन हरीजी महाराज यांची जामनेर येथील श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाला सदिच्छा भेट..!



जामनेर प्रतिनिधी: आज रोजी फैजपूर येथील सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर स्वामी श्री .जनार्दन हरीजी महाराज यांनी जामनेर येथील श्रीराम मंदिर निधी संकलन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यांच्या समवेत परमपूज्य श्री श्याम चैतन्यजी महाराज सुद्धा उपस्थित होते. 

श्री जनार्दन महाराजांनी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून तमाम हिंदू बांधवांना अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिर निर्माण साठी सढळ हातांनी मदत करा असे आव्हान केले. यावेळी कार्यालय प्रमुख सुखदेव महाजन, तालुका कार्यवाहक निलेश माळी, तालुका संघचालक डॉ. संदीप पाचंगे, प्रखंड प्रमुख प्रवीण सुशिर, गजानन कच्छवाह, महाले आप्पा, श्याम मुळे, गजानन माळी डॉ. मनोज विसपुते, कर्ण बारी, सुदर्शन वराडे, आकाश नेमाडे, श्याम पगारे इत्यादी स्वयंसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध