Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ जानेवारी, २०२१
परंडा येथे पत्रकार दिनानिमित्त,पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव....
परंडा (राहूल शिंदे) दि.6 तालुक्यातील पत्रकार बांधवांचा तसेच स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिक्षक सोसायटी परंडा येथे साजरा करण्यात आला.
तालुक्यातील राज कोचिंग क्लासेस आयोजित पत्रकार बांधवांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. बालाजी महाराज बोराडे यांची उपस्थिती होती, प्रमुख पाहुणे व ज्यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला ते परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जी गिड्डे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन सारिका सचिन चेंडगे तर आभार प्रदर्शन पांडुरंग कोकणे यांनी मांडले.
यावेळी परंडा तालुक्यातील पत्रकार आनंद खर्डेकर दैनिक सकाळ, प्रमोद वेदपाठक दैनिक दिव्य मराठी, प्रशांत मिश्रा दैनिक एकमत, भजनदास गुडे दैनिक जनमत, विजय माने पोलखोल न्यूज नेटवर्क,अप्पासाहेब शिंदे दैनिक तरुण भारत,गणेश राशनकर पत्रकार दैनिक जनप्रवास,अमोल निकाळजे पत्रकार साप्ताहिक विचार विद्यार्थ्यांचे,विजय शेवाळे एबीपी माझा, राहुल शिंदे विभागीय संपादक दैनिक तरुण गर्जना, आशुतोष बनसोडे दैनिक पुढारी, निसार मुजावर दैनिक पुज्य नगरी, तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी,पालक ॲड संतोष सुर्यवंशी,ॲड आप्पासाहेब जगताप, किरण देशमुख दिनेश, गोडगे कृषी सहाय्यक, राज कोचिंग क्लासेसचे संचालक सुजित बाळासाहेब देशमुख, अमोल देवकर, राहुल मुगळीकर , आप्पासाहेब जगताप , अमोल केदारने , सचिन चेंडगे, रेवन भोसले,दत्ता गटकुळ, सुदाम देशमुख, अभिमान यादव, सचिन घाडगे, यु एस बुरंगे, रणजीत घाडगे,नितीन घाडगे, रवींद्र कापसे, किसन अंधारे, दैवान पाटील,प्रफुल्ल झाडबुके, सतिश करळे, बाळासाहेब देशमुख,जयसिंग घाडगे,बाबुराव देशमुख आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा