Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ जानेवारी, २०२१

आ.डॉ.संजय कुटे यांच्याहस्ते सिटी-स्कॅन मशीनचे थाटात लोकार्पण..!




शेगांव प्रतिनिधी:येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीनचे थाटात लोकार्पण जळगाव जा मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे, नगराध्यक्ष सौ शकुंतलाताई पांडुरंग बुच यांच्या हस्ते आज 23 जानेवारी रोजी पार पडले.
   
खारपान पट्टा आणि संतनगरीत दूरवरून रुग्ण या रुग्णालयात येतात. जिल्ह्यात बुलडाणा नंतर सिटी स्कॅन करिता रुग्णांना अकोला येथे जावे लागत होते मात्र रुग्णालयाच्या पाठपुराव्यामुळे व आमदार डॉ संजय कुटे यांच्या परिश्रमाने सदरची मशीन रुग्णालयात जनसेवेसाठी आली आज ह्या मशीनचे लोकार्पण झाले आहे. यावेळी नगर परिषदेच्या उपाध्यक्ष सौ ज्योतीताई संजय कलोरे, आरोग्य सभापती सौ मंगलाताई कमलाकर चव्हाण, नगरसेविका ज्योतिताई अशोक चांडक, भाजपाचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, महिला अध्यक्ष डॉ ज्योतिताई दिलीप भुतडा, ज्येष्ठनेते सुधाकर चव्हाण, रुग्ण कल्याण समितीचे प्रमोद काठोळे, प्रदीप सांगळे, पांडुरंग बुच, दीपक धमाळ, राजेश अग्रवाल, कमलाकर चव्हाण, अशोक चांडक यांची उपस्थिती होती.
     
यावेळी रुग्णालयाचे निवासी वैधकीय अधिकारी डॉ प्रशांत चव्हाण, प्रशासकीय अधिकारी डॉ आप्पासाहेब डांबरे, डॉ प्राची जाधव, डॉ संन्गमवार, डॉ ढोकने, डॉ आशुतोष पंडित, डॉ खेकाडे, क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी मिलिंद कस्तुरे, हनुमान काकडे, मेट्रोन आरती वैध, परिसेविका एन बी धाकडे, पीएचएन ए. के.पिसे वैशाली यादव, सुशीला हिवरखेडे, निलम मयेकर, विशाल औटकर, प्रशांत मानकर, अनिल पिवाल, श्रीधर टाले आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध