Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ३० जानेवारी, २०२१

गुरु पुष्य अमृत योगावर शेगावात भाविकांची दर्शनासाठी गर्दी..!




शेगाव प्रतिनिधी:भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या गुरु पुष्य अमृत योगा वर श्रींचे दर्शन घेण्यासाठी शेगाव येथे मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती संतनगरी असलेल्या शेगाव शहर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून विख्यात आहे. 

श्री संत गजानन महाराज यांना भाविक गोरगरिबांची माऊली म्हणतात 28 जानेवारी रोजी धार्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण वार गुरुवार तसेच गुरुपुष्यामृत हा योग जुळून आल्यामुळे या पवित्र पर्वावर श्रींचे दर्शन घेता यावे या उद्देशाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून खाजगी वाहनासह राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी महामंडळ द्वारे प्रवास करून हजारो भाविक श्रींच्या मंदिर परिसरात जमले होते. 

कोरोना प्रादुर्भाव वाढू नये याकरिता राज्य शासनाने लागू केलेल्या नियमानुसार श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी ई दर्शन पास काढणे जरुरी आहे त्यामुळे पहाटे पाच वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत वेगवेगळ्या वेळेनुसार दर्शन पास काढलेले भाविक त्या वेळेनुसार श्रींच्या दर्शनासाठी मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर एकत्रित होतांना दिसत होते कोरोना नियमाची कडेकोट पालन करीत भाविक मोठ्या  श्रद्धेने दर्शन घेत होते. 

हजारो भाविकांनी दर्शना सोबतच श्रींच्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला श्री संत गजानन महाराज मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी  शिवशंकर भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी विश्वस्त निळकंठ दादा पाटील यांच्या देखरेखीखाली श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर आवारात कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये या साठी  जागोजागी सेवेसाठी उपस्थित असलेले सेवाधारी कोरोना प्रादुर्भाव चा धोका लक्षात घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेमध्ये सहा सहा फूट अंतर ठेवून चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध