Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शेगाव शहराचे मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये दि.२८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान दोन रेती माफियांमध्ये तुडुंब हाणामारी
शेगाव शहराचे मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये दि.२८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान दोन रेती माफियांमध्ये तुडुंब हाणामारी
शेगाव (प्रतिनिधी) शहराचे मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये दि.२८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजे दरम्यान दोन रेती माफियांमध्ये
तुडुंब हाणामारी झाली. या घटनेमुळे चौकामध्ये काही काळ तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,शेगाव परिसरात पोलीस आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी जोरात सुरू आहे.रेती माफिया वर कोणतीही कारवाई होत नसल्याने परिसरांमध्ये रेती माफियांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे.
त्यामुळे ग्राहक शोधण्यासाठी आपसी स्पर्धासुद्धा पहावयास मिळते.अशाच शुल्लक कारणावरून शेगाव येथील अतिशय वर्दळीच्या असलेल्या व शहराचे हृदयस्थान म्हणून ओळखल्या जाणाया छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये २८ जानेवारी रोजी दुपारी चार साडेचार वाजे दरम्यान दोघा रेती माफियांमध्ये वादावादी झाली.वादाचे पर्यावसन हाणामारी मध्ये झाल्यामुळे घटनास्थळावर शेकडोंचा जमाव एकत्रित झाला होता. यावेळी पोलिस दिसेनासे झाले होते.त्यामुळे काही काळ चौकामध्ये तनाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
शेगाव शहर हे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक तीर्थस्थळ असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष न दिल्यास शेगाव शहराची शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा