Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २५ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील राहणारे व शिरपूर येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडियम मध्ये शिक्षक सुनील दामू सोनवणे वय ३६ यांचा दुर्दैवी मृत्यू..!
शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील राहणारे व शिरपूर येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडियम मध्ये शिक्षक सुनील दामू सोनवणे वय ३६ यांचा दुर्दैवी मृत्यू..!
शिरपूर प्रतिनिधी:घरात लग्नाची तयारी सुरू होती. लवकरच लहान भावाचे लग्न होते. लग्न पुढच्या महिन्यात ठरवण्यात आलेले होते. लग्नाची लगबग सुरु होती. घरात आनंदी आनंद वातावरण होतं. घरावर रोषणाई करण्यात आलेली होती. दोन दिवसांपूर्वीच नवरदेव- नवरीचे कपडे अर्थात बस्ताही जळगाव येथे उरकण्यात आलेला होता. मध्येच रविवारी सकाळी तीन वाजेच्या सुमारास घरातील कर्त्या पुरुषाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.आणि आनंदाचे वातावरण दुःखात लोटले गेले.
शिरपूर तालुक्यातील खर्दे येथील राहणारे व शिरपूर येथील आर.सी.पटेल इंग्लिश मेडियम मध्ये शिक्षक असणारे सुनील दामू सोनवणे वय ३६ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सुनील यांना रविवारी सकाळी एक वाजेच्या सुमारास त्रास होऊ लागला. यानंतर त्यांना दवाखान्यात नेले असता तीन वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सुनील दामू सोनवणे यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.चार वर्षांपूर्वीच सुनील यांचा लहान असलेला भावाचा असाच दुर्दैवी मृत्यू झालेला होता. त्यामुळे या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सुनील दामू सोनवणे हे चार भाऊ होते.सुनील हे सर्वात मोठे भाऊ. यातील दोन नंबरचा भाऊ आनंद चा ही चार वर्षांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झालेला होता. सर्वात लहान भाऊ अजय चे पुढच्या महिन्यातील २८ फेब्रुवारी रोजी लग्न ठरलं होत.
परिवारात लग्नाची लगबग सुरू होती.
सुनील हे मातंग समाजाचे.त्यांचा जय बँड च्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह सुरू होता.बँड त्यांचे वडील दामू सोनवणे व तीन नंबर चा भाऊ जनार्दन सांभाळतो.लहान भाऊ अजय निम्स मध्ये नोकरीला आहे.
सुनील यांच्या पश्चात वडील,पत्नी,दोन मुले व एक मुलगी,दोन भाऊ असा परिवार आहे.मुलगी नववीत शिक्षण घेत आहे. तर मुले एक सातवी व व एक चौथीला शिकत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
दिंडोरी (प्रतिनिधी) माधव खाबिया :- दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथे आज बुधवार दि.३१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास येथील शेतकरी ...
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा