Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

श्रीराम मंदिर निर्माण निधि संकलन अभियान कार्यालयाचे शुभारंभ..!



शेगांव:प्रतिनिधी (उमेश राजगुरे) श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्यदिव्य श्रीराम मंदिरासाठी  देशव्यापी निधी संकलन व गृह संपर्क अभियान दिनांक १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी यादरम्यान होणार असून या पवित्रकार्यासाठी शेगांव शहर व तालुका कार्यालयाचा उदघाटन सोहळा दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक अग्रेसन चौक येथे पार पडला. 
        
याप्रसंगी भागवताचार्य ह.भ.प.रामकृष्ण महाराज ताकोते ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक चित्तरंजन दास राठी, जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, विहिंप अकोला विभाग मंत्री चंद्रकांत घोराडे ,तालूका संघचालक श्रीराम पुंडे , नगर संघचालक शामसुंदर तेल्हारकर , तालुका अभियान प्रमुख विजय राठी , नगर अधक्ष्या सौ. शकुंतला ताई बूच, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती .
              
प्रमुख मान्यवरांनी  मार्गदर्शन करून सर्वांनी सर्वच स्थरातून यामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान केले, कार्यक्रमाचे संचालन नगर अभियान प्रमुख सोमेश कांबळे यांनी तर आभार विनोद लांजुळकर यांनी मानले, या याप्रसंगी शहरातील संतोष बाप्पू देशमुख, पांडुरंग बूच ,विजय भाडतीलक, डॉ. मोहन बानोले ,ज्ञानेश्वर साखरे, विजय यादव ,शेखर नागपाल ,शरदसेठ अग्रवाल ,प्रदीप सांगळे ,अशोक चांडक ,मनीष नारणोलीया, राजेश अग्रवाल,प्रफुल देशमुख ,सागर गलवाडे,अजित नायसे ,गणेश शेळके , मिलिंद शाहू ,राजेंद्र देशमुख,यासह प्रतिष्ठित नागरीक,व्यापारी ,डॉक्टर ,वकील ,स्वयंसेवक,रामभक्त यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध