Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जानेवारी, २०२१
धुळे, शिरपूर आगारातून तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी स्वतंत्र बसेस सोडणार....!
धुळे प्रतिनिधी:या योजनेंतर्गत धुळे आगारातून दर रविवारी शेगाव तीर्थक्षेत्रासाठी सकाळी ६.३० वाजता बस सोडण्यात येईल. ही बस रात्री ९.३० वाजता धुळ्यात परत येईल. तर पर्यटकांसाठी दर रविवारी धुळ्याहून घृष्णेश्वर, वेरूळ लेणी,भद्रा मारुती, दौलताबाद दर्शनासाठी बस सोडण्यात येणार आहे. ही बस सकाळी ६ वाजता सुटून रात्री ९ वाजता धुळ्यात परतेल.
तसेच शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी धुळे आगारातून औरंगाबाद, देवगड, नेवासा, शनिशिंगणापूर, पैठण, जायकवाडी या पर्यटन क्षेत्रासाठी सकाळी ६ वाजता बस सोडण्यात येईल. ही बस रात्री ९ वाजता धुळ्यात परतेल. तसेच शिरपूर आगारातून नांदुरीगड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसाठी बस सोडण्यात येणार आहे.
या योजनेचा शुभारंभ ९ व १० जानेवारीपासून होत आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ व विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा