Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जानेवारी, २०२१
धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे गहू पिकांचे नुकसान...!
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात वर्षाच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गहू हरभरा ज्वारी ही पिके वादळामुळे आडवी झाली असून यामुळे शेतकऱ्यांचा स्वप्न आता धुळीस मिळाले आहे या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे आणि खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाले आहेत मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कडे लक्ष देत नव्या उमेदीने पेरण्या केल्या होत्या मात्र रब्बी हंगामातील पीक बहरले असतानाच या अवकाळी पावसामुळे उभी पिके उध्वस्त झाली आहेत.
शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी कंचनपुर डोंगरगाव वालखेडा वाघाडी डोंगरगाव माळीच कलमाडी यासह परिसरात झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
धुळे शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसात 7.75 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली असून या अवकाळी पावसाचा फटका कांद्यालाही बसला आहेत. कांद्यावर चरपा रोगाचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना असल्याने हे नुकसान होऊ नये यासाठी शेतकर्यांवर पुन्हा एकदा फवारणीची वेळ आली आहे.
दरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा