Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २८ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
लोकनेते स्व. ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराबरोबरच भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर
लोकनेते स्व. ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराबरोबरच भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे कुटुंबासह रक्तदान राज्यातील तरुणांनी रक्तदान करण्याचे आवाहन
तिवसा, दि. 28 : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपले वडील लोकनेते,माजी आमदार स्व.भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांक्षासमवेत रक्तदान करून तरुणाईला रक्तदानासाठी पुढे येण्याचा संदेश दिला.
लोकनेते, माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आज तिवसा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयात रक्तदान करून आपल्या वडिलांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनेही स्वतः पुढे येऊन रक्तदान चळवळ वाढविण्याचे आवाहन मंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
गेल्या ९ वर्षांपासून माजी आमदार स्व. ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीच्या तिवसा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. आज यावेळी दीडशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी वडिलांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांची मुलगी आकांक्षा व मुलगा यशवर्धन यांनीही रक्तदान केले.
गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यांच्यानंतरही ही विधायक परंपरा त्यांच्या जयंतीनिमित्त पाळली जाते, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी सांगितले. रक्तदान शिबिराला दरवर्षी प्रतिसाद वाढत आहे. मागील वर्षापासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करतो. रक्ताच्या नात्यातून प्रेमाचे, बंधुतेचे नाते जुळविण्याचा हा प्रयत्न आहे.
रक्तदानाला प्राणदानाचे मोल आहे. ते श्रेष्ठ दान मानले जाते. रुग्णालये, दवाखाने, रक्तपेढ्या येथे गरजूंसाठी पुरेसा साठा आवश्यक असतो. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः तरुणांनी नियमित रक्तदान करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.
लोकनेते स्व. ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराबरोबरच भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीर तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आरोग्य सेविकांचा सन्मान व सत्कार अशा अनेकविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७१,८३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त क...
-
बापू चव्हाण नाशिक जोपूळ येथील प्राथमिक शाळेची वाटचाल प्रगतीपथावर असून शाळेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे गौरवोद्गार अ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा