Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ६ जानेवारी, २०२१

शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा..!आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन..!



शेगाव:प्रतिनिधी (उमेश राजगुरे) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नित  शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चौधरी तर प्रमुख उपस्थिती जेष्ठ पत्रकार अविनाश दळवी यांची होती.
यावेळी जेष्ठ पत्रकार अविनाश दळवी व अध्यक्ष राजेश चौधरी यांचे हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर व श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना उपस्थित सर्वांकडून पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
 
कार्यक्रमास तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अमर बोरसे,पत्रकार संजय ठाकूर, संजय त्रिवेदी,नानाराव पाटील,धनराज ससाणे,राजकुमार व्यास,प्रशांत खत्री,अमर बोरसे,प्रदीप सनानसे,सिद्धार्थ गावंडे,राजवर्धन शेगावकर,सरचिटणीस देवानंद उमाळे, श्याम देशमुख, अरुण भटकर,देवचंद्र समदूर,उमेश शिरसाट,सचिन कडूकार,उमेश राजगुरे, प्रवीण मोरे,रोहित देशमुख, सौरभ स्वामी,आनंद जवंजाळ,मनोज वर्मा,महेंद्र मिश्रा,समीर देशमुख आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष फहींम देशमुख यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध