Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१
राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची घोषणा
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जारी
राज्यातल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. यंदाच्या वर्षी 12वीची परीक्षा 23 एप्रिलपासून सुरू होईल तर 21 मे रोजी 12वीचा शेवटचा पेपर असेल, तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 29 मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. 10वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
मागच्यावर्षी कोरोना व्हायरसमुळे शाळा आणि कॉलेज सुरू झाली नव्हती, त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती. दरम्यान कोरोनामुळे बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा जानेवारी महिन्याच्या अखेर सुरू करणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.
पण चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा