Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६
पालखेड बंधारा येथे जन आरोग्य समितीची बैठक संपन्न,बैठकीत आरोग्य स्वच्छता याबाबत चर्चा.
दिंडोरी प्रतिनिधी :-
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील प्रा.उपकेंद्रात जन आरोग्य समितीची बैठक नुकतीच पार पडली.
पार पडलेल्या जन आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत गाव आणि परिसर पातळीवरील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.याशिवाय आरोग्य विषयक कार्यक्रमांची चर्चा करून सर्वानुमते मान्यता देण्यात आली यामध्ये परिसर स्वच्छता बंधारा आणि आसपासच्या परिसरातील कचऱ्याची योग्य विलेवाट लावण्याबाबत नियोजन करणे, नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता व क्लोरीनेशन करण्यावर भर दिला गेला.तसेच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि साथीचे आजार पसरू नये म्हणून सांडपाण्याच्या डबक्यांची विल्हेवाट लावण्याचे ठरविण्यात आले.पावसाळा किंवा हवामान बदलण्याच्या बदल्याच्या काळात पसरणाऱ्या डेंगू मलेरिया आणि गॅस्ट्रो सारख्या आजारांना रोखण्यासाठी पूर्वतयारी व उपाय योजनांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध ठेवणे आणि वैद्यकीय सेवा नागरिकांपर्यंत सुलभपणे पोहोचवणे यावर भर देण्यात आला.ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अभियानाचे महत्त्व आणि उघड्यावरील अन्न न खाण्याबाबत जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले.याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.यावेळी यावेळी नूतन कार्यकारणीतील अध्यक्ष रेखा गांगुर्डे, उपाध्यक्ष संगीता बोंबले विशेष निमंत्रित सदस्य बापू (तात्या) चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बापू (तात्या) चव्हाण यांनी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी समिती अध्यक्ष रेखा गांगुर्डे,उपाध्यक्ष संगीता बोंबले, सहअध्यक्ष डॉ.कल्पेश चोपडे, सदस्य सचिव डॉ.धीरज गुंजाळ वैशाली बदादे,अशा सदस्य रंजना कडाळे,आरोग्य सेविका संगीता साबळे,आरोग्य सेवक योगेश वैद्यकार,कल्पना गायकवाड,मुक्ता कोकाटे,शितल गोतरणे,उषा गांगोडे,बेबीताई सोळशे,आदींसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा