Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २३ जानेवारी, २०२१

सायकल चालवून आपण एक प्रकारे देशसेवाच करीत असतो- माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे..! नगरपालिका आणि रोटरी क्लब तर्फे सायकल रॅली संपन्नसंपन्न..!



खामगाव च्या हितेश जैन व शेगाव च्या कुमारी सेजल चांडक लकी ड्रॉ द्वारे ठरले सायकल विजेते


शेगाव प्रतिनिधी:सायकल चालविल्या मुळे  पर्यावरण रक्षण आरोग्याचे रक्षण तर होतेच परंतु इंधन वाचत असल्यामुळे पर्यायाने देशाचे परकीय चलन वाचते व त्या माध्यमातून देशसेवाच घडते असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री व या विभागाचे विद्यमान आमदार संजय कुटे यांनी येथे केले सायकल चालवा निरोगी राहा सायकल चालवा पर्यावरण वाचवा सायकल चालवा इंधन वाचवा असा संदेश देत नगरपालिका आणि सामाजिक संस्था रोटरी क्लब रोटरी क्लब क्लब च्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार 23 जानेवारी रोजी भव्य सायकल रॅली संपन्न झाली स्थानिक गांधी चौक नगरपालिका कार्यालय समोरून माजी मंत्री व या भागाचे विद्यमान आमदार डॉक्टर संजय भाऊ कुटे,नगराध्यक्ष शकुंतला पांडुरंग बुच,शेगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष टाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला आमदार कुटे, ठाणेदार टाले हे स्वतः रॅलीमध्ये सायकल चालविताना सहभागी झाले होते. 

त्यामुळे रॅलीमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढलेला दिसत होता नगरपालिके च्या कार्यालयापासून सुरू झालेली ही सायकल रॅली मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक अग्रेशन महाराज चौक रेल्वे स्थानक सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह समोरून तहसील कार्यालय चौक श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज समोरून ही रॅली खामगाव रोडवर असलेल्या हॉटेल पंचवटी वर पोहोचली यावेळी लकी ड्रॉ द्वारे दोघांना शेगाव अर्बन बँकेच्या वतीने सायकल सप्रेम भेट देण्यात आली सायकल विजेत्यांमध्ये शेगाव येथील कुमारी चांडक व खामगाव येथील हितेश जैन हे दोघे भाग्यवान ठरले याचप्रमाणे स्पेशल स्पोर्ट्स शूज करिता दोघांची नावे लकी ड्रॉ काढण्यात आली यामध्ये मयूर अग्रवाल मास्टर खाडे हे दोघे भाग्यवान ठरले यावेळी माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल नगर पालिकेच्या उपाध्यक्ष कलोरे मॅडम सर्व सभापती शेगाव नगरपालिकेचे शहर अभियान व व्यवस्थापक नानाराव इंगळे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध