Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जानेवारी, २०२१
प्रवीण भाई भोई, एक कुशल नेतृत्व..!
गुजरात मधील अंबाला येथिल भोई समाज मंदिर भोई समाजाच्या इतिहासातील एक अशी ठेवण, जी पुढील काही शतके स्मरणात राहील..
गुजरात मधील गोधरा येथील प्रवीण भाई भोई यांच्या गुणसंपन्न नेतृत्वात गुजरात मध्ये एक भव्य असे भोई समाज भवन उभे राहिले आहे.
प्रवीण भाई भोई यांच्याशी साधारण पाच-सहा वर्षांपूर्वी माझा संबंध आला. त्यांची सामाजिक तळमळ पाहून मी आणि किशोरजी शिवदे वरिष्ठांसोबत बोललो आणि गुजरात मधील भोई समाजाच्या कार्यासाठी त्यांची नियुक्ती गुजरात प्रदेश अध्यक्ष म्हणून करण्यात आली. मात्र संघटना-संघटना मधील अंतर्गत कलह पाहता त्यांनी स्वतंत्र असे गुजरात चे क्रांतिदल सेवा ट्रस्ट हे संघटन उभे केले आणि त्याचे रजिस्ट्रेशन देखील केले.
गुजरात मधील भोई समाजाला एक दूरदृष्टी असलेला असा सर्वगुणसंपन्न नेता मिळालेला होता, जो समाजासाठी खूप तळमळ करीत होता आणि समाजाच्या उत्थानासाठी दिवस-रात्र मेहनत करीत होता.
प्रवीण भाई चलते गए और कारवाॅं बनता गया.. त्यांची कार्यशैली आणि कार्यपद्धती बघुन गुजरात मधील भोई समाजाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि एक खूप मोठी टीम एकत्रित आली व कामाला देखील लागली. चार वर्ष आधी स्थापन झालेल्या या संघटनेने गुजरात मध्ये भोई समाजासाठी असे काही करुन दाखविले, की जे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या नेत्यांच्या डोळ्यात अंजण घालण्यास पर्याप्त आहे...
भारताच्या अनेक राज्यांमध्ये भोई समाज आहे आणि समाजाचे अनेक नेते उदयास आलेले आहेत.... परंतु फक्त समाजाचे नेते म्हणून मिरविण्यातच त्यांना धन्यता वाटली... समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी प्रयत्न करताना काही नेतेमंडळी नक्कीच दिसली, परंतु ठोस असे कुठलेही पाऊल उचलतांना कोणीही दिसला नाही..
प्रवीणभाई भोई मात्र एक वेगळे व्यक्तिमत्व ठरले आणि त्यांनी आपल्या नेतृत्वातून भोई समाजाच्या लोकांत जागृती आणली... त्यांच्या अथक प्रयत्नांतून फक्त चार वर्षाच्या त्यांच्या नेतृत्वाच्या कारकिर्दीत बनासकाठा जिल्ह्यातील अंबाला येथे भव्य असे चार मजली भोई समाज मंदिर उभे करण्यात आलेले आहे आणि आता काम शेवटच्या फिनीशिंग टप्प्यात आहे.
फक्त नेते म्हणून मिरविणारे अनेक लोकं तुम्हां-आम्हांला ठाऊक आहेत,परंतु समाजासाठी काही ठोस करणारे नेतेमंडळी फारच कमी आहेत. असे ठोस कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे समाजाचे नेतृत्व दिल्यास कसे कार्य उभे राहते , याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गुजरातचे *प्रवीणभाई भोई आहेत.
असे नेते सर्व राज्यांत तयार झाल्यास भोई समाजाची एक नवीन वाटचाल सुरू होईल आणि भोई समाजाचा नवा इतिहास नक्कीच वेगळा असेल यात तिळमात्र शंका नाही.. प्रवीणभाईंसोबत अनेक सामाजिक विषयांवर नेहमीच चर्चा होत असते. भविष्यात भोई समाजासाठी यूपीएससी आणि इतर शैक्षणिक क्षेत्रात पाऊल टाकण्याचे स्वप्न प्रवीणभाई भोई यांचे आहे.
संघटनांमधील वाद मिटविले आणि सर्व एकत्र आले व समाजाने थोडीशी साथ दिली तर महाराष्ट्रात देखील हे शक्य आहे...
अशा या सर्वगुणसंपन्न, सामाजिक बांधिलकी जपणारे,आपल्या नेतृत्वाचा ठसा संपूर्ण गुजरात आणि गुजरात बाहेर देखील भोई समाजावर उमटविणारे, सामाजिक तळमळ असणारे,दूरदृष्टी असलेले प्रवीण भाई भोई यांना माझा मानाचा मुजरा
रोहितभाऊ शिंगाणे
प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र
भोई समाज सेना.
9423289332 /9545676118
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...


प्रविन भाई भोई यांच्या कार्यास सादर प्रणाम.आपणही मुंगीचावाटा उचलुन समाजासाठी एक काम करायचे ठरवुया. एक पाऊल योग्य दिशेला टाकुया.
उत्तर द्याहटवाश्री प्रवीण भाई भोई यांच्या कार्यास सादर प्रणामआपणही मुंगीच्या वाटाऊचलून समाजातील एक काम करायचे आपण ठरू या एक पाउल योग्य दिशेला टाकूया
उत्तर द्याहटवासामाजिक बांधिलकी जपणारे,आपल्या नेतृत्वाचा ठसा संपूर्ण गुजरात आणि गुजरात बाहेर देखील भोई समाजावर उमटविणारे, सामाजिक तळमळ असणारे,दूरदृष्टी असलेले प्रवीण भाई भोई यांना माझा मानाचा मुजरा...
उत्तर द्याहटवाजितेंद्र धनराळे.
नायब तहसिलदार,जळगांव