Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १० जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
निरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार...!पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन...!
निरोड अतिक्रमण धारकांचा नमुना ८अ चा प्रश्नन मार्गी लावणार...!पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे आश्र्वासन...!
संग्रामपूर प्रतिनिधी:तालुक्यातील निरोड (बाजार) येथिल बंद पडलेल्या बाजाराची शासकीय जागा अतिक्रमण धारकांच्या नावे करण्यात यावी अशी मागणी अनुप देशमुख यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या कडे निवेदनातून केली आहे. निरोड येथिल ५० ते ५५कुटुंब गेल्या पन्नास वर्षापासून गावालगत बंद असल्याने बाजाराच्या जागेवर गट नंबर २१७ मधे वास्तव्यास आहेत.
ह्या रहीवासी असलेल्या नागरिकांना ग्राम पंचायत मार्फत विजेचा,पाणीपुरवठा,
लागणा-या ईतर सुविधा मिळत आहेत.परंतु या जागेवर वास्तव्य करून राहणा-या लोकांच्या नावे शासनाने घरकुल मंजूर केले पण यांच्या नावाने गाव नमुना ८अ नसल्यामुळे हे सर्व लाभार्थी घरकुल योजने पासून वंचित राहत आहेत.
या संदर्भात पाठपुरावा करुण जिल्हा प्रशासन दिरंगाई करत आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांच्या नावे गाव नमुना ८अ ग्रामपंचायत दप्तरी नोंद करण्यात यावी याकरीता अनुप देशमुख, दिनेश सुरळकार, यांनी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी हा निरोड वासियांचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्र्वासन पालकमंत्री डॉ शिंगणे यांच्या कडुन देण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा