Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ जानेवारी, २०२१

शिरपूर तालुक्यातील असली ग्रामपंचायत बिनविरोध...!



शिरपूर प्रतिनिधी: तालुक्यातील असली ग्रामपंचायत बिनविरोध झालेली असून आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

रुपाली सुनील कोळी, हिराबाई भिका कोळी, राजेंद्र बाबुराव धनगर, वसंत पुना भिल, सरलाबाई पांडुरंग धनगर, नूरसिंग ओंकार पावरा, पार्वताबाई रघुनाथ वंजारी, अनिताबाई आपाराम कोळी, उखडू गुलाब कोळी, सुनील बिसन मोरे, दुर्गाबाई कैलास मोरे हे बिनविरोध निवडून आले. पॅनल बिनविरोध निवड होण्यासाठी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, युवक यांनी प्रयत्न केले तसेच राहुल ईशी, सुनील वाघ, किरण कोळी, छोटू धनगर, भूषण धनगर, भटू कोळी, अमोल कोळी, सुरेश मोरे यांनी परिश्रम घेतले.

आमदार कार्यालय जनक व्हीला येथे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

******
शिरपूर तालुक्यातील हिंगोणीपाडा ग्रामपंचायत बिनविरोध..!


शिरपूर प्रतिनिधी:तालुक्यातील हिंगोणीपाडा ग्रामपंचायत बिनविरोध झालेली असून आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तारसिंग पावरा यांच्या पॅनलचे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.

पावरा बिनाबाई सत्तारसिंग, पावरा संगीताबाई तिनशा, पावरा सुनीता अत्तरसिंग, पावरा सत्तारसिंग दुर्गा, पावरा सुमित्रा सुरुपसिंग, पावरा इताराम रतन, पावरा प्यारीबाई गमन्या हे बिनविरोध निवडून आले.

आमदार कार्यालय जनक व्हीला येथे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

******
शिरपूर तालुक्यातील वाठोडे ग्रामपंचायत बिनविरोध...!


शिरपूर प्रतिनिधी : तालुक्यातील वाठोडे ग्रामपंचायत बिनविरोध झालेली असून यानिमित्ताने ग्रामस्थांनी आगळावेगळा इतिहास घडवून आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिरामदादा पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणसिंह कोंडूसिंह चौधरी यांचे नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास दर्शविला आहे.

गेल्या ३७ वर्षांपासून नारायणसिंह चौधरी (माजी सभापती, मार्केट कमिटी व विद्यमान सरपंच) यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत क्रांती पॅनलची वाठोडे ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता राहीलेली आहे.

माघारीनंतर सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. संगीता प्रकाश चौधरी, जयश्री नारायण शिरसाठ, देविदास बारकू भिल, नारायण कोंडूसिंग चौधरी, वंदनाबाई देवराम कोळी, सकूबाई भिका भिल, संग्राम जयराम भिल, सरलाबाई आसाराम भोई, भिकुबाई फुलसिंग भिल हे बिनविरोध झाले आहेत.

प्रत्येक पंचवार्षिक काळात वाठोडे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी नारायणसिंह चौधरी यांनी अथक परिश्रम घेेेतले आहेत. आपल्या सत्ताकाळात गावाच्या चौफेर विकासासाठी नारायणसिंह चौधरी यांनी परिश्रम घेऊन गावाचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे.

गेल्या पाच वर्षात गावात विकासकामांचा कळस त्यांनी चढविलेला आहे. त्यासाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा करुन विविध योजना त्यांनी मंजूर करून आणल्या.

आमदार कार्यालय जनक व्हीला येथे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध