Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १७ जानेवारी, २०२१

धुळे जिल्हा तेली समाज युवक आघाडी तर्फे जयदत्त क्षिरसागर यांचा सत्कार..!



शिरपूर(प्रतिनिधी) अखिल भारतीय तेली समाज साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री, ओ बी सी समाजाचे जेष्ठ नेते जयदत्तजी क्षिरसागर यांचा  धुळे जिल्हा तेली समाज युवक आघाडीतर्फे त्यांचा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांया हस्ते सत्कार करण्यात आला.
     
माजी मंत्री तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जयदत्तजी क्षिरसागर हे नंदुरबार येथे आले असता त्यांचे स्वागत व सत्कार धुळे जिल्हा तेली समाज युवक आघाडीतर्फे महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मा आमदार शिरिषदादा चौधरी, उपाध्यक्ष हिरालाल काका चौधरी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ प्रियाताई महिंद्रे,राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णराव हिंगणकर, राष्ट्रीय सचिव डॉ अरुण भस्मे, राष्ट्रीय तेली समाज युवक आघाडीचे उपाध्यक्ष विजयभाऊ चौधरी, प्रवक्ते विक्रांत चांदवडकर,श्री मंगल मासिकाचे संपादक जि.एम. जाधव,हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रविंद्रबापू चौधरी,सांगली येथील अशोक संकपाळ विजय संकपाळ विभागीय उपाध्यक्ष दिपक चौधरी, विभागीय सरचिटणीस प्रा उमेश चौधरी , जिल्हाध्यक्ष सुनिल चौधरी,प्रदेश सदस्य मनोज चौधरी खांडबारा , मयूर चौधरी शहादा,सिंदखेडा येथील लक्ष्मण चौधरी,  सिंदखेडा जय संताजी युवा मंचचे तालुकाध्यक्ष हितेश चौधरी, बळवंत जाधव,मंदार चौधरी, धुळे येथील प्रा सागर चौधरी, उद्योजक दाऊ शेठ चौधरी  यांचेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
      
यावेळी राज्यातील व नाशिक विभागातील कार्याचा आढावा प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांनी सादर केला.
      
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर यांनी आढावा जाणून घेऊन युवक आघाडीच्या कार्याचा गौरव करून प्रदेश उपाध्यक्ष शामकांत ईशी यांचे कामाचे विशेष कौतुक करून भविष्यात जोमाने काम करून समाजाचे व संघटना वाढीचे काम करण्याचे आवाहन केले.
       
याप्रसंगी मा आमदार शिरिषदादा चौधरी, विजय भाऊ चौधरी, विक्रांत चांदवडकर यांनीही युवक आघाडीच्या व शामकांत ईशी यांच्या कार्याचे कौतुक केले प्रास्ताविक दिपक चौधरी यांनी तर आभार प्रा उमेश चौधरी यांनी माणलेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध