Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथेल कोविड योद्धाना तीन महीन्याचे वेतन कधी ?



धुळे प्रतिनिधी:विभागीय निवड मंडळामार्फत नियुक्त (DSB) व बंधपत्रीत सहाय्यक प्राध्यापक/सहाय्यक अधिव्याख्यातायांच्या प्रलंबित वेतनाबाबत.श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धुळे येथे तात्पुरत्या नियुक्तीने (DSB) व बंधपत्रीत कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापक व सहाय्यक अधिव्याख्याता यांचे मागील तीन महिन्यांचे (ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर) वेतन थकीत आहे तसेच महाराष्ट्रातील उर्वरित सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तात्पुरत्या नियुक्तीने (DSB) व बंधपत्रीत कार्यरत असलेल्या सहाय्यक प्राध्यापक व सहाय्यक अधिव्याख्याता यांचे मागील दोन महिन्यांचे(ऑक्टोबर,नोव्हेंबर) वेतन अदा करण्यात आलेले आहे.

थकीत वेतनाबाबत आपल्या महाविद्यालयात विचारणा केली असता पुरेसा निधी नसल्याचे कारण सागण्यात येते. महाविद्यालयातल सहाय्यक प्राध्यापक कोविड रुग्ण चिकित्सा व स्नातकपूर्व विध्यार्थ्यांचे अध्यापन असे दुहेरी कामकाज बजावत आहेत.

तीन महिन्याचे वेतन नसल्याने सर्व DSB सहाय्यक प्राध्यापकांना दैनंदिन जीवनात अडचण निर्माण होत आहे व उदरनिर्वाह कसा करावा हा मोठा प्रश्न वैद्याकीय अध्यापकांना पडला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध