Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेगाव मध्ये २ दिवसीय उपवास आंदोलन..!



शेगांव: प्रतिनिधी (उमेश राजगुरे)
दिल्लीच्या उंबरठ्यावर गेल्या ४५-४६ दिवसांपासून चालू असलेल्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच त्यांचे आत्मबल उंचावण्यासाठी दोन दिवसीय उपवास आंदोलन आज सकाळी शेगाव शहर येथील महात्मा गांधी चौकात माजी नगराध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील यांच्या नेतृत्वात सुरू झाले. 

उपवास आंदोलनात शहराध्यक्ष दीपक सलामपुरीया, सरचिटणीस दिलीप पटोकार, सोनाजी कळसकार, नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, शैलेश पटोकार, त्र्यंबक पाटील, प्रल्हाद डाबेराव सहभागी झालेत. प्रथमतः संत श्री गजानन महाराज ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. 

ह्या प्रसंगी खामगाव विधानसभा पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील, ज्येष्ठ नेते दयारामभाऊ वानखडे, सहकार नेते पांडुरंगदादा पाटील, मा. नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले, अभयसिंह मोहता, किरण बापू देशमुख, डॉबुढन जमदार,जिल्हा सरचिटणीस कैलाश देशमुख, प्रकाश शेगोकार, अशोकराव हिंगणे, गोपालभाऊ कलोरे,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.असलम खान, संदीप काळे,शिवशंकर धनोकार, भिकूभैय्या सारवान, गजानन कळसकार जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, हाशम भाई, शेख असलम,शिवसेना तालुकप्रमुख उमेश पाटील,


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध