Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० जानेवारी, २०२१

स्टार एअरची नाशिक ते बेळगाव नॉन स्टॉप विमानसेवा २५ जानेवारी पासून सुरू होणार...!



नाशिक ते बेळगावी दरम्यानच्या थेट विमानसेवेमुळे ‘प्रादेशिक एअरोस्पेस’ क्षेत्राला चालना मिळणार आहे कारण बेळगावी हे भारतातील पहिले खाजगी ‘एअरोस्पेस एसईझेड’ आहे. भारताचे संरक्षण आणि एअरोस्पेस उत्पादनाचे केंद्रस्थान असलेले बेळगावी हे नाशिकसह जगभरातील एअरोस्पेस क्षेत्राच्या महत्तवपूर्ण अभियांत्रिकी गरजांची पूर्तता करते.अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असणारी नाशिक आणि उत्तर कर्नाटक यांना थेट जोडणारी विमानसेवा लवकरच सुरू होत आहे. 

बेंगळुरूस्थित स्टार एअर ही भारतातील अग्रगण्य प्रादेशिक विमान कंपनी आपल्या दुसर्‍या वर्धापनदिनानिमित्त आणि UDAN योजनेअंतर्गत २५ जानेवारी २०२१ पासून बेळगावी ते नाशिक दरम्यान थेट उड्डाण सेवा सुरू करून आपल्या विमानसेवेचा विस्तार करत आहे.

नाशिक आणि बेळगावी हे अंतर साधारणपणे ५८०km चे असून ११-१२तासांचा प्रवास आता या विमान सेवेमुळे आता फक्त १तासमध्ये पूर्ण करता येणार आहे.

नाशिककरांसाठी या विमान सेवेमुळे आता उत्तर कर्नाटक (बेळगावी, हुबळी, धारवाड, विजापूर), दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी) तसेच गोवा या ठिकाणी प्रवास करणे अत्यंत सोयीचे होणार आहे.

आपल्या नाशिक ते बेळगावी या नव्या मार्गाबद्दल बोलताना स्टार एअरचे संचालक श्री. श्रेणिक घोडावत म्हणाले, “स्टार एअर दोन प्रमुख भारतीय शहरांना जोडणार असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यामुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी नक्कीच वाढेल आणि दोन्ही राज्यांतील व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल.” या विमानसेवेमुळे नाशिक आणि आसपासच्या परिसरातील पर्यटकांना बेळगावपासून सुमारे दीड तासांच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूर व गोव्याला भेट देता येणार आहे. याचबरोबर स्टार एअरच्या उड्डाण सेवेमुळे बेळगावी आणि आसपासच्या जिल्ह्यांतून लाखो भाविकांना महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानी नाशिक व तसेच शिर्डीला येणे आता सुलभ होणार आहे.

संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष श्री. संजय घोडावत म्हणाले, ‘आरसीएस-उडान अंतर्गत भारतातील दुसर्‍या व तिसर्‍या श्रेणीच्या शहरांना जोडणार असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. प्रवाशांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देत असतो. अब्जावधी डॉलर्सच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी नाशिक अत्यंत महत्त्वाचे असल्याने नाशिकहून उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आम्ही खरोखरच उत्सुक आहोत, ज्यामुळे औद्योगिक उपक्रमांना नक्कीच मदत होईल.

स्टार एअर ही भारतातील एकमेव एअरलाइन आहे जी अद्ययावत Embraer ERJ145, या विमानांचा वापर करते. Embraer कंपनी ची विमाने ही आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित म्हणून जगभरात प्रचलित आहेत.

नाशिक ते बेळगाव दरम्यान आठवड्यातून तीन वेळा म्हणजेच सोमवार, शुक्रवार आणि रविवार ही थेट विमानसेवा चालू करीत आहे. उद्घाटनानिमित्त व आरसीएस-उडान योजनेअंतर्गत ही विमानसेवा मर्यादित कालावधीसाठी फक्त 1999/- मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

स्टार एअर सध्या अहमदाबाद, अजमेर (किशनगड), बेळगावी, बेंगळुरू, दिल्ली (हिंडन), हुबळी, तिरुपती, इंदूर, कलबुर्गी, मुंबई आणि सुरतसह 10 हून अधिक भारतीय शहरांना सेवा पुरवते. याशिवाय लवकरच जोधपूर व जामनगरला जाणारी सेवाही सुरू होणार आहे.

संजय घोडावत ग्रुप हा भारतातील एक अग्रगण्य उद्याग समूह आहे,हा उद्योग समूह विमानसेवा,शिक्षण,कन्सुमर प्रॉडक्ट्स, फुड्स,अपारंपारिक ऊर्जा,उत्खनन, टेक्सटाइल,सॉफ्टवेअर,रिटेल,रियाल्टी अशा अनेक उद्योगांमध्ये गेल्या २५वर्षांपासून अग्रेसर आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध