Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ७ जानेवारी, २०२१

शिवसेना कार्यालय गणेश मार्केट सांगली येथे पत्रकार दिन, व ममता दिन कार्यालयाच्या वतीने संपन्न झाला....!


 
 
सागली प्रतिनिधी:दिनांक 6 /1/2021 बुधवार शिवसेना कार्यालय गणेश मार्केट सांगली येथे पत्रकार दिन, व ममता दिन कार्यालयाच्या वतीने संपन्न झाला यावेळी दैनिक पुढारी चे उपसंपादक अमृतजी चौगुले, केसरीचे ज्येष्ठ पत्रकार हेप्पळकर साहेब, व तरुण भारतचे  सचिन ठाणेकर, यांनी अनुक्रमे आचार्य बाळशास्त्री जांभेकर व तमाम शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन वरील मान्यवरांच्या हस्तेकरण्यात आले. 
       
तसेच यावेळी वरील उपस्थित पत्रकारांचा शिवसैनिकांच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
 
यावेळी उपस्थित पत्रकार यांना शिवसैनिक म्हणाले की आपण पत्रकारिता करताना सांगलीच्या विकासासंदर्भात पेपर मधून जनजागृती करणे गरजेचे आहे .
       
सांगली-मिरज शहरे नुसती मोठी असून विकासापासून वंचित आहेत यासंदर्भात पत्रकारांनी व राजकीय कार्यकर्त्यांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.
     
या प्रश्नाला उत्तर देताना उपस्थित पत्रकारांनी असे मत व्यक्त केले की पत्रकार व राजकीय कार्यकर्ते हे एका नांगराचे दोन बैल आहेत या दोघांनी मिळून विकासाचा नांगर ओढत नेल्यास चांगल्या विकासाची शहरात पेरणी होणार आहे. यावेळी पुढे बोलताना शिवसैनिकांनी म्हणाले की सांगलीत रस्ते मोठे होत असताना मात्र पन्नास वर्षांपूर्वीचे MSEB चे खांब रस्त्यावर तसेच उभे आहेत त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारे सर्व MSEB चे खांब हटवून अंतर्गत भूमार्गाने विद्युत वाहिन्या टाकने अतिशय गरजेचे आहे त्यासाठी पत्रकाराने आवाज उठवावा असे शिवसैनिकांनी मागणी केली यासंदर्भात शिवसैनिकांनी 3 वर्षापूर्वी 2018 साली महाराष्ट्र सरकार कडे निवेदन दिले होते त्यासाठी तात्कालीन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगली-मिरज महापालिका क्षेत्रासाठी अंतर्गत भुयारी विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 27 कोटीचा निधी मंजूर केला होता पण सदरचा निधी कागदावरच राहिला त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे प्रश्न घेऊन पत्रकाराने सांगलीच्या विकासासाठी योगदान द्यावे अशी शिवसैनिकांनी मत व्यक्त केले.
   
यावेळी उपस्थित रावसाहेब घेवारे, प्रसाद रिसवडे, जितेंद्र शहा, अनिल शेटे, प्रभाकर कुरळपकर, प्रकाश लवटे,महिला आघाडी सांगली शहर प्रमुख मानसी जितेंद्र शहा, जयश्री कोळी इत्यादी उपस्थित होते.
तरुण गर्जना प्रतिनिधी प्रमोद चिनकेसांगली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध