Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना..! एक नगरसेवक निवडून आणण्याचे दिले आवाहन..!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना..! एक नगरसेवक निवडून आणण्याचे दिले आवाहन..!
नाशिक प्रतिनिधी : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी शासनाने तत्त्वत: मान्यता दिली असून, नगरसेवकांनी पुढील पंचवीस वर्ष मतदारांच्या लक्षात राहतील असे प्रभागनिहाय प्रकल्प सुचवावेत.त्यासाठी मदत करू,असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला.महापालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रत्येक नगरसेवकाने बरोबरीने एक नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील विकासकामांसंदर्भात पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे यांची वेळ मागितली होती. त्यानुसार मुंबई येथील वर्षा निवासस्थानी शनिवारी श्री. ठाकरे यांनी नगरसेवकांना संबोधित केले. त्या वेळी नाशिकच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. शिवसेनेने दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. गेल्या चार वर्षांच्या भाजपच्या सत्ताकाळात विकासकामे न झाल्याने शहराचा विकास खुंटला आहे. ज्या वेळी राज्यात सत्ता होती त्या वेळी प्रलंबित मागण्या सोडविल्या नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नाशिकच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. यामध्ये शहरात स्मार्ट स्कूल योजना राबविणे,धार्मिक,कृषी,आरोग्य व पर्यटन विकास आराखडा तयार करावा, शहराचा विकास आडव्या पद्धतीने करण्यासाठी १०० फुटी बाह्य वळण रस्ता करावा, प्रलंबित आकृतीबंध मंजूर करावा, सेवा प्रवेश नियमावलीला मान्यता मिळावी, अनुकंपातत्त्वावरील नेमणुकीला मान्यता द्यावी, आरोग्य व अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्यास मान्यता द्यावी, सातवा वेतन आयोग लागू करावा आणि गोदावरी नदी स्वच्छता व शुद्धीकरणासाठी मलनिस्सारण केंद्राची उभारणी करावी. याबाबत योग्य कार्यवाही करु असे ठाकरे म्हणाले,
विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर व गटनेते विलास शिंदे यांनी हे निवेदन दिले. खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, दत्ता गायकवाड, सुनील बागूल, वसंत गिते, विनायक पांडे, नगरसेवक प्रवीण तिदमे, सूर्यकांत लवटे, डी. जी. सूर्यवंशी, भागवत आरोटे, सुदाम डेमसे, केशव पोरजे, संतोष गायकवाड, प्रशांत दिवे, सत्यभामा गाडेकर, सुवर्णा मटाले, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, मंगला आढाव, पूनम मोगरे आदी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी संघटनात्मक बांधणीचा आढावा सादर केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरात संशयास्पद गोळीबारात तरुणाचा मृत्यू; पोलिस तपास सुरू अमळनेर (प्रतिनिधी) – शहरातील शाह आलम नगर परिसरात एका तरुणाचा गोळी लागून मृत्यू ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा