Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १७ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
मी साधारण व्यक्ती. दोन कोटींची मालमत्ताही नाही तर सरपंचपदासाठी 2.05 कोटी कसे देऊ शकतो?.
मी साधारण व्यक्ती. दोन कोटींची मालमत्ताही नाही तर सरपंचपदासाठी 2.05 कोटी कसे देऊ शकतो?.
नाशिक प्रतिनिधी: सरपंचपदाचा लिलाव 2.05 कोटींना झाला, यामुळे उमराणे (देवळा) ग्रामपंचायतची निवडणूक आयोगाने रद्द केली. त्यानंतर या गावात वेगळ्याच प्रतिक्रीया उमटल्या. लिलाव घेतल्याची चर्चा असलेले सुनिल दत्तू देवरे यांनी चक्क हात झटकले आहेत. ते म्हणाले,तो लिलाव नव्हता.मी साधारण व्यक्ती. दोन कोटींची मालमत्ताही नाही तर सरपंचपदासाठी 2.05 कोटी कसे देऊ शकतो?.
निवडणुका बिनविरोध करण्यासाठी विविध आमदार निधी देण्याची घोषणा करीत आहेत. मात्र उमराणे (देवळा) येथे निवडणुकीला फाटा देत चक्क सरपंचपदाचा लिलाव झाला होता. कांदा बाजारपेठ असलेल्या संपन्न गावात सरपंच पदाच्या लिलावाची बोली एक कोटी 11 लाखांपासून सुरु झाली. त्यात सुनील दत्तू देवरे यांनी दोन कोटी पाच लाखांची बोली देऊन सरपंचपद पटकावले असा व्हीडीओ व्हायरल झाला होता.
त्याची एव्हढी चर्चा झाली की, राज्य निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली. जिल्हाधिका-यांकडून अहवाल मागविला. त्या अहवालात जिल्हाधिकारी यांनी लिलाव झाल्याच्या वृत्ताची पृष्टी केली होती. त्यामुळे उमराणे (ता. देवळा) ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यात आली. दुस-या टपप्प्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात या बहुचर्चीत लिलावात दोन कोटींची बोली लावणारे सुनिल दत्तू देवरे म्हणाले, हा सर्व गैरसमज आहे. मी एक साधारण व्यक्ती आहे. माझ्याकडे दोन कोटींची मालमत्ता देखील नाही. मग दोन कोटी रुपये कसे देणार?. राज्य आयोगानेच निवडणूक थांबवल्याने त्यांच्यापुढे कोण व कसे बोलणार?. त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अनोळखी मृतदेह माधव खाबिया :- पोलीस उप निरीक्षक, किरण विठठल जगदाळे नेम वणी पोलीस ठाणे, नाशिक ग्रामिण यांचे कडे दाखल अ...
-
शिरपूर (प्रतिनिधी) राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिरपूर तालुक्यात मोठी कारवाई करत अवैध मद्यसाठ्यावर घाव घातला आहे. देवदत्त नेहळे, निरीक्षक र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा