Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

गृहिणी.....




"पहाटेच्या साखरझोपेच्या वेळी हळुवार घेतलेला निःश्वास म्हणजे ' स्री'.... कुंतीपुत्र कर्णाचे अजून एक सुंदर वाक्य ... मला वाटतं स्री म्हटलं की सौदर्य आलचं, म्हणजे ती कशी दिसते, कशी राहते , काय करते ह्या पेक्षा ती स्री आहे हेच तिचे सौंदर्य.. त्यातल्या त्यात ती जर गृहिणी असेल तर ती अजून छान दिसते आणि असते पण... बघा तरी एकदा तिला घरकाम करतांना मग कळेल... गृहिणी म्हणजे गृह सांभाळत असून देखील तीला कुणीही हिनल्या शिवाय राहत नाही अशी ही गृहिणी... गृहिणी शिवाय दुसरा चांगला जॉब आहे का सांगा बरं, सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपेपर्यंत तिने घरतल्यांकडे बघायचं हवं नको ती सगळी कामं करायची. तीला स्वतः चा असा मुड नसतो की अमुक वेळेला हे काम करायचं आणि मुड नसला की नाही करायचे . गृहिनीला दुखणं- खुपण पण नसतं म्हणजे तीला काहीही होत असेल तरी तिला घरातलं आवरून च विश्रांती घ्यायची आहे. 

आणि ह्या गृहिणीची मुख्य जबाबदारी सासरच घर म्हणजे माहेरी कितीही काही गरज असली तरी तिला पटकन हे सगळं सोडून जाता येत नाही , त्यासाठी तिला permission घ्यावी लागते. आणि ती परवानगी मिळेल याची शास्वती नाही..... असो काही महिलांना गृहिणी असल्याचा न्यूनगंड वाटतो कारण काय तर त्या कमवत नाही . 

ऑक्सफर्ड डीक्शनरीत गृहिणी ह्या शब्दाचा अर्थ असा सांगितला आहे,"A married woman whose main Occupations is caring for her family , managing household affairs and doing housewife" म्हणजे "एक  लग्न झालेली स्री तिने घराचं ताबा घेऊन परिवाराची काळजी घ्यायची , सगळी कामं करून संपूर्ण परिवाराच व्यवस्थापन करायचं."अशी जीची व्याख्या असेल ती सामान्य कशी असेल बरं उलट तिला अभिमान वाटायला हवा की मी गृहिणी आहे. मला असं म्हणायचं नाही की नोकरी करणाऱ्या महिला घर सांभाळत नाही त्यापण त्यांची जबाबदारी उत्तम पार पाडतात, फक्त घर सांभाळणाऱ्या  महिलांची चूक झालेली चालतं नाही, अरे त्यांच्या कडून पण  एखाद्या कामात चूक होऊ शकते ना?. .. स्वामी विवेकानंदांना एकदा विदेशात गेले असतांना तिथल्या एका महिलेने विचारले की भारतातील स्रीया फक्त घरातील छोटी मोठी कामे करतात ना... त्यावर स्वामी विवेकानंदांनी सांगितले की मला ना तुमच्या देशातील मुलांची कीव येते कारण त्यांना आईचे प्रेम , त्याग माहीतच नाही , याउलट आमच्या  भारतातील स्रीया घराकडे जातीने लक्ष देऊन आपला वेळ सत्कारणी लावतात व मुलांचे आयुष्य घडवतात. 

म्हणून जर का तुम्ही गृहिणी असाल तर अजिबात कमीपणा वाटून घेऊ नका. कारण आपण काम कुठलं करतोय यापेक्षा जर आपण स्वतः आपल्या आयुष्यात क्लिअर असू तर आपल्या मुलांना आयुष्याची  क्लॅरीटी दाखवू शकू.. शेवटी एकच सांगते सर्वच स्त्रियांना .. स्वतः ला जपायच, स्वतः मधल्या स्वतः लाच प्रेमाने गोंजरायच .....

सौ सोनाली शरद पाटील....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध