Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जानेवारी, २०२१
Home
/
Unlabelled
/
श्वेतंबर श्रीमुर्तीपुजक संघ शिरपूरतर्फे मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न..!
श्वेतंबर श्रीमुर्तीपुजक संघ शिरपूरतर्फे मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांचा सन्मान सत्कार सोहळा संपन्न..!
शिरपूर प्रतिनिधी:शहरातील जैन गल्लीतील जैन उपाश्रामध्ये धर्मचक्र तीर्थाचे शिल्पकार आचार्य भगवंत श्रीजी दर्शन वल्लभ सुरीश्वरजी म.सा.अर्हमवल्लभ सुरीश्वरजी म.सा.मुनीश्री नम्रमुनीवल्लभ सुरीश्वरजी म.सा.आदी ठाणा ३यांचे दोन दिवसापूर्वीच सुवर्ण नगरीत आगमन झाले यांच्या समवेत येथील मुर्तीपुजक श्री संघाने मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांना सन्मान पत्रक शाल देऊन गौरविण्यात आले यावेळी आचार्य भगवंत श्रीजी दर्शनवल्लभ सुरीश्वरजी महाराज यांनी प्रवचनातून संसार आणि संयम या विषयावर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन दिले.
याप्रसंगी जालण्याचे संगीतकार मेहूल जैन व शिरपूर चे रोनक कोचर यांनी धार्मिक जैन स्तवन म्हणत भाविकांना तल्लीन केले तद्नंतर मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पार्श्वनाथ भगवान यांच्या जन्मकल्याणक महोत्सव दिना निमित्ताने काव्य हितेश जैन या ९ वर्षाच्या बालकाने निरंकट ३ उपवास केल्या चे कौतुक समाजबांधवांनी केले अजून अन्य भाविकांची तपस्या असल्याचे समाजबांधवांनी सांगितले यावेळी जैन समाजाचे उपाध्यक्ष नितीन जैन , हसमुखलाल जैन.जतीन जैन,किर्ती जैन , हितेश जैन,प्रसन्न जैन,आनिल जैन तसेच वीर पिता गौतम चोरडिया,वीर माता मिना चोरडिया यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा