Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ५ जानेवारी, २०२१
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या गाडीमध्ये मुंबईपर्यंत गांजा तस्करी...!
धुळे : मुंबई येथे विक्रीच्या उद्देशाने जाणारा सुमारे 10 किलो गांजा मोहाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने जप्त केला असून या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तब्बल तीन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून पुढील कारवाई करीत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या गाडीमध्ये मुंबईपर्यंत गांजा तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब यात समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एमएमआरडीए विभागात कार्यरत असलेल्या एका वाहनातून शिरपूर येथून मुंबईकडे दहा किलो गांजा नेला जात असल्याची पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर, सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात दहा किलो गांजा आढळून आला.
याप्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या इरफान युसुफ अन्सारी आणि रीहान कुरेशी या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबईला हा गांजा नेमका कुठे घेऊन जाण्यात येत होता, या गांज्याचा मुंबईतील बॉलिवूड शी काही संबंध तर नाही ना, यामागे मोठी टोळी सक्रीय आहे का? याचाही शोध धुळे जिल्हा पोलीसांना कडून घेतला जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा