Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१
शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात हाणामारीपरस्पर विरोधी फिर्याद दाखल...!
शिरपूर प्रतिनिधी: शेतात जाण्याचा कच्चा रस्ता ओला करुन टाकल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर नेण्यास त्रास होतो असे म्हणत जाब विचारण्यावरुन हाणामारी झाल्याची घटना बुधवारी शिरपूर तालुक्यातील टेकवाडे शिवारात घडली.याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली.
शिरपूर तालुक्यातील टेकवाडे येथील सदाशिव विठाराम वाडीले यांनी एका गटाकडून फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ जानेवारी रोजी दुपारी मुन्ना मधुकर चौधरी आणि मधुकर वेडू चौधरी या दोघांनी वाद घालत हातातील लोखंडी सळईने मुन्ना चौधरीला पाठीवर, हातावर, पायावर बेदम मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोघा बाप-बेट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या गटाकडून मधुकर वेडू चौधरी यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार, ६ जानेवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टेकवाडे शिवारातील शेतात कांतीलाल मधुकर भोई, भुरा मधुकर भोई, सदाशिव मिठाराम भोई यांनी गाऱ्हाणे केल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करीत हाताबुक्याने मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया:- वणी पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांचेकडील पोलीस ठाण्यात गुरन व कलम सि.सि.टी.एन.एम. गुरनं २९८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे ...
-
© डॉ. दिलीप तिवारी पाळधी - तरसोद बायपासवरील रेल्वे पुलाचा तरसोदकडील भागाचा उजवीकडील भराव कोसळून तीन महिने होत आले आहेत. तेथील दुरुस्तीच्या क...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा