Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ जानेवारी, २०२१
शरद पवारांचं ‘गंभीर’ वक्तव्य..!धनंजय मुंडेंवरचे आरोप गंभीर..!
मुंबई प्रतिनिधी: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर हे प्रकरण आता तापू लागलं आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेणार? याविषयी चर्चा सुरू झाली होती.
त्याला आता खुद्द शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. ‘काल मुंडेंनी मला भेटून या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. त्यानुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्या संबंधातून काही तक्रारी झाल्या. पोलीस स्थानकात त्यांच्याबद्दलची एक तक्रार आली. त्यासंबंधीची चौकशीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
हे प्रकरण असं होईल आणि व्यक्तिगत आरोप होतील असा अंदाज त्यांना असावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात भूमिका आधीच मांडली होती. त्यावर उच्च न्यायालयाचा आदेश प्राप्त करून घेतला आहे’,असं शरद पवार म्हणाले. वायबी सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.
पक्ष म्हणून लवकरात लवकर पावलं उचलू
याविषयी बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, ‘त्यांच्यावर करण्यात आलेला आरोप गंभीर आहे. यासंबंधीचा विचार पक्ष म्हणून आम्हाला करावा लागेल. पक्षातल्या माझ्या प्रमुख सहकाऱ्यांशी माझं काही बोलणं झालेलं नाही. यासगळ्यांना मी विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडणार आहे.
त्यावर माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती बाकीच्या सहकाऱ्यांना सांगून इतरांची मतं लक्षात घेऊन पुढची पावलं टाकणं. हे आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. कोर्टाचा जो निर्णय होईल, पोलीस तपास होईल, त्यात मी पडणार नाही. पण पक्ष म्हणून आम्हाला जी काही पावलं उचलावी लागतील, ती आम्ही नक्की उचलू.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा